EVM hacking allegations : ईव्हीएमचा घोळ रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिलेदाराचा 'जालीम' तोडगा! मतदानानंतर सांगितले 'ते' 3 उपाय; विरोधकांची झोप उडाली!

EVM security News : राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी शनिवारी सकाळपासूनच मतदान होत आहे. मतदानासाठी काही ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या आहेत.
EVM Machine Issue
EVM Machine Issue Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी शनिवारी सकाळपासूनच मतदान होत आहे. मतदानासाठी काही ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून ईव्हीएम हॅक होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले असतानाच आता असा प्रकार होऊ नये यासाठी तीन जालीम उपाय उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने सुचवले आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शनिवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी त्यांच्या कळंब तालुक्यातील गोवर्धनवाडी येथे मतदान केले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ईव्हीएम हॅक होऊ नये यासाठी तीन जालीम उपाय सुचवले आहेत. हे उपाय केले तरी ईव्हीएममधील घोळ होणार नाही आणि करण्याचा प्रयत्न झाला तर तो समोर येईल, असा दावा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला.

EVM Machine Issue
Pravin Darekar BJP : राष्ट्रवादीचं स्टिअरिंग तटकरे-पटेलांकडे? प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यानं भाजपचा ‘गेमप्लॅन’ उघड!

गेल्या काही दिवसापासून ईव्हीएमवर आरोप केले जात आहेत. आपण जर या यंत्रणेविषयी अविश्वास व्यक्त केला तर सर्वसामान्य नागरिकांना काय वाटेल, असा सवालही यानिमित्ताने निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. तर त्यासोबतच माझी भूमिका स्पष्ट असून ईव्हीएममध्ये घोळ होऊ नये, यासाठी मी कार्यकर्त्यांना दोन ते तीन गोष्टी चेक करायला सांगितल्या असल्याचे खासदार राजेनिंबाळकर (Om Rajenimbalkar) यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना स्पष्ट केले.

EVM Machine Issue
Pravin Darekar BJP : राष्ट्रवादीचं स्टिअरिंग तटकरे-पटेलांकडे? प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यानं भाजपचा ‘गेमप्लॅन’ उघड!

खासदार राजेनिंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार मतदान सुरु होण्यापूर्वी सकाळी मॉक पॉल होतात. त्यावेळी निवडणूक अधिकारी 50 मते टाकून दाखवत असतात. त्याचा डेमो यावेळी दिला जातो. मतदान केंद्र अधिकारी जेव्हा ही 50 मते टाकतात. तेव्हा ती संबंधित चिन्हाला गेली आहेत की नाही हे तपासले पाहिजे.

EVM Machine Issue
BJP mayor candidate controversy : सुरुवात झाली अन् सत्तेआधीच दुही माजली! भिवंडीत भाजपमध्ये ‘इनसाईड गेम’ रंगणार

त्याशिवाय ईव्हीएम मशीन रिसेट केले की नाही याची खात्री करण्याची गरज आहे. मशीन लॉक केली तर त्यात बदल होत नाही, असा दावा निंबाळकर यांनी केला. त्यासोबतच संपूर्ण मतदान झाल्यानंतर मतदान केंद्रावरील अधिकारी हे मशीन सील करतात. त्यावेळी मशीनवरील जो सीरीअल नंबर आहे तो नोंदवून ठेवा. तर मतमोजणीवेळी त्याच सीरीअल क्रमांकाची मशीन आली की नाही हे तपासा, असेही निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या आहेत.

EVM Machine Issue
NCP (SP) News : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या एकमेव नगरसेवकाने घेतला महापौर, उपमहापौर पदासाठी अर्ज!

बोगस मतदारांवर गुन्हे नोंदवल्याचा दिला दाखला

ईव्हीएम मशीनमधून घोळ होत नाही. पण एकाच ठिकाणी बोगस मतदान घडवून आणले जाते. एकाच ठिकाणी 600, 600 अथवा अधिकचे एकगठ्ठा मतदान केले जाते. दुसर्‍या जिल्ह्यातून बोगस मतदार आणून हे मतदान घडवून आणले जाते. त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा बोगस मतदारांवर गुन्हे नोंदवल्याचा दाखलाही खासदार राजेनिंबाळकर यांनी यावेळी दिला.

EVM Machine Issue
Congress Politics : शेवटच्या क्षणी गेम फिरला! महापौर पद काँग्रेसलाच मिळणार, वडेट्टीवार यांची माघार, देशमुख होणार उपमहापौर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com