Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! कर्जमाफीचा दुसरा हप्ता खात्यात जमा; असं तपासा यादीत तुमचे नाव आहे की नाही?

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme : शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! कर्जमाफीचा दुसरा हप्ता खात्यात जमा झाला आहे. लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे की नाही, असे तपासा.
Farmer Loan Waiver
Farmer Loan WaiverSarkarnama
Published on
Updated on

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी एका क्लिकद्वारे या योजनेतील दुसऱ्या टप्प्याचे वितरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.

या टप्प्यात 6 लाख 36 हजार 36 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून, त्यांच्या खात्यांमध्ये 5,086 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT पद्धतीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचवण्यात आली. त्यामुळे मध्यस्थाशिवाय पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा थेट फायदा मिळाला आहे.

Farmer Loan Waiver
BJP Leader : भाजपमध्ये पक्ष विलीन केला, पण विचार न पटल्याने सोडचिठ्ठी; बडा नेता CM विजय यांच्या गळाला

यापूर्वी कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 6 लाख 22 हजार 207 शेतकऱ्यांना 5,029 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला होता. पहिला आणि दुसरा टप्पा मिळून आतापर्यंत 12.56 लाख शेतकऱ्यांना एकूण 10,115 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना, "राज्याच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला हक्क आहे," असे सांगितले. उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठीही पुढील प्रक्रिया सुरू असून, त्यांना आगामी टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कर्जमाफीच्या यादीत तुमचे नाव आहे का?

कर्जमाफी यादीतील तुमचे नाव तपासण्यासाठी संबंधित सरकारी पोर्टलवर जावे. त्यानंतर लाभार्थी यादी किंवा कर्जमाफी योजना यादी हा पर्याय निवडा. मागितलेली जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत आणि बँकेची माहिती भरा. माहिती सबमिट केल्यानंतर संबंधित गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल. त्यामध्ये तुमचे नाव शोधता येईल.

Farmer Loan Waiver
Bharat Gogawale : पालकमंत्रीपदाचा तटकरेंचा दावा गोगावलेंना मान्य; म्हणाले, 'त्यांचेही सहकार्य लाभले...'

काही ठिकाणी कर्जमाफीची लाभार्थी यादी अपडेट करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या यादीत नाव दिसत नसले तरी पात्र शेतकऱ्यांना पुढील टप्प्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत यादी वेळोवेळी तपासणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com