ACB Niphad Trap : निरंकुश प्रशासन! शिपायानेच घेतली साडेतीन लाखांची लाच? नेमकं प्रकरण काय

Nashik Farmers Politics : जमीन मोजणीचा नकाशा देण्यासाठी शेतकऱ्याकडे साडेतीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार निफाड येथे समोर आला आहे. यामुळे निरंकुश प्रशासनावर अंकुश कधी लागणार असा सवाल आता शेतकरी करताना दिसत आहेत.
ACB Niphad Trap
ACB Niphad Trapsarkarnama
Published on
Updated on

Nashik News : भ्रष्टाचार आणि लाच मागण्यात शासकीय कर्मचाऱ्यांना कोणतेही बंधन राहिलेले नाही, असेच काहीसे सध्याचे चित्र आहे. निफाड येथे मोजणी केलेल्या जमिनीचा नकाशा देण्यासाठी शिपायाने चार लाख रुपये लाच मागितल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे यात वरिष्ठाचे नावाचा वापर करण्यात आला आहे. तर फक्त शेतकऱ्याने धाडस केल्याने हा प्रकार उघड झाला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात महसूल विभाग आघाडीवर आहे. त्याबाबतचे अनेक अहवाल प्रसिद्ध झाले आहे. मात्र महाराष्ट्र शासनाकडून त्यावर नियंत्रणासाठी काहीही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यातूनच लाच मागण्याचे धाडस दिवसेंदिवस वाढत आहे.

निफाड (नाशिक) येथील उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. या संदर्भात दीक्षि येथील शेतकऱ्याने आपल्या जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज दिला होता. जानेवारी महिन्यात अर्ज दिल्यावर जमिनीची मोजणी देखील करण्यात आली होती. मात्र जाणीवपूर्वक त्याचा नकाशा आणि जमिनीवर खुणा करणे शिल्लक ठेवण्यात आले होते.

ACB Niphad Trap
Nashik-Pune Semi-high Speed Train : 'नाशिक-पुणे सेमी हायस्पीड' रेल्वे मार्गाबाबतच्या बैठकीत होती 'या' सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

यासंदर्भात संबंधित शेतकऱ्याने गेली दोन महिने सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र कार्यालयातील प्रशासनाने त्याला अजिबात दाद दिली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याचा फायदा कार्यालयातील शिपायाने घेतला. वरिष्ठ उपाधीक्षक भाबड हे आपले 'खास' आहेत. एकाच दिवसात तुमचे काम होईल. त्यासाठी चार लाख रुपये द्यावेत, असे कार्यालयातील शिपायाने सांगितले.

शेतकरी आणि शिपाई यांच्यात तडजोडी अंती साडेतीन लाख रुपये देण्याचे ठरले. हे पैसे उपअधीक्षक भाबड यांना देण्यात येतील, असे शिपायाने सांगितले होते. त्रस्त शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर या विभागाने रचलेल्या सापळ्यात शिपाई गाडे अडकला.

ACB Niphad Trap
Nashik Pune semi high-speed rail : 'नाशिक-पुणे सेमी हायस्पीड' रेल्वे मार्गाबाबतच्या सर्वपक्षीय कृती समितीत प्रकल्पाचे प्रवर्तक शिवाजीराव आढळराव पाटीलच नाही!

यासंदर्भात निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिपाई गाडे याला पोलिसांनी लाच घेताना पैशांसह अटक केली आहे. लाच आणि भ्रष्टाचार यामध्ये भूमी अभिलेख कार्यालय आघाडीवर आहे. याबाबत अनेक तक्रारी आणि कारवाया झाल्या आहेत. मात्र अद्यापही प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. त्यात आधीच कोरफळलेल्या शेतकऱ्यांची लूट होत असल्याची स्थिती आहे. याबाबत राज्य सरकार काही उपाययोजना करणार का आणि सेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत होणारा विलंब दूर करेल का? असा प्रश्न विचारला जात आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com