Maharashtra FDA : तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न; 'FDA'च्या कारवाईवर हॉटेल संघटनांची नाराजी

Hotel bodies support FDA drive, oppose naming businesses before inquiry ends : अन्नसुरक्षा मोहिमेला पाठिंबा कायम, मात्र तपास पूर्ण होण्यापूर्वी व्यावसायिकांची नावे जाहीर करणे अन्यायकारक असल्याचा दावा.
Maharashtra FDA
Maharashtra FDASarkarnama
Published on
Updated on

Hotel Associations Maharashtra : राज्यात अन्नसुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) राबवत असलेल्या कारवाईचे हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्रातील प्रमुख संघटनांनी स्वागत केले आहे.

मात्र, तपासणी पूर्ण होण्यापूर्वी व्यावसायिकांची नावे सार्वजनिक करून त्यांची प्रतिमा मलिन केली जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी FDAचा कारभार स्वीकारल्यानंतर सुरू झालेल्या काही कार्यपद्धतींवरही संघटनांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

'हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया', 'नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया' आणि 'इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन' यांनी संयुक्त भूमिका मांडत, अन्नसुरक्षेबाबत कठोर भूमिका आवश्यक असल्याचे मान्य केले. मात्र, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी संबंधित व्यावसायिकांना सार्वजनिकरीत्या दोषी ठरवणे न्याय्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संघटनांच्या म्हणण्यानुसार, अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कोणतीही कठोर कारवाई करण्यापूर्वी संबंधित व्यावसायिकांना आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी वेळ आणि संधी देणे अपेक्षित असते. त्यामुळे FDA ची तपासणी ही दंडात्मक नसून सल्लागार आणि सुधारात्मक स्वरूपाची असावी, अशी त्यांची मागणी आहे.

Maharashtra FDA
Amol Khatal : 'भावी मुख्यमंत्र्यांना पुन्हा स्वप्न पडायला लागली'; अमोल खताळांचा थोरातांवर नाव न घेता घणाघात

त्यांच्या मते, अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसाय दशकांपासून ग्राहकांचा विश्वास, नियमांचे पालन आणि मोठ्या गुंतवणुकीच्या आधारावर उभे आहेत. अशा परिस्थितीत प्राथमिक तपासणीचे अहवाल किंवा नावे सार्वजनिक झाल्यास व्यवसायाची प्रतिमा, ग्राहकांचा विश्वास आणि हजारो कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो.

Maharashtra FDA
NEET Protest Student Attack : 'नीट' आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला; 'मोदींच्या राजीनाम्याची मागणी का केली?' असा प्रश्न करत मारहाण

दरम्यान, FDA ने राज्यभर सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत अनेक हॉटेल, उपाहारगृहे, बेकरी आणि खाद्य व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. मात्र, परवाना निलंबित होणे म्हणजे तो कायमस्वरूपी रद्द झाला, असा अर्थ होत नाही, असे FDA अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

तपासणीदरम्यान स्वच्छतेचा अभाव, पेस्ट कंट्रोल न करणे, अस्वच्छ परिसर, अन्नसुरक्षा निकषांचे उल्लंघन, आवश्यक नोंदी न ठेवणे किंवा इतर गंभीर त्रुटी आढळल्यास संबंधित परवानाधारकावर प्रथम निलंबनाची कारवाई केली जाते. FDA च्या प्रक्रियेनुसार, परवाना निलंबित झाल्यानंतर संबंधित व्यावसायिकाला साधारण 15 दिवसांची मुदत दिली जाते. या कालावधीत आवश्यक सुधारणा करून त्याचा अनुपालन अहवाल FDA कडे सादर करावा लागतो.

सर्व त्रुटी दूर झाल्याची खात्री झाल्यानंतरच परवाना पूर्ववत केला जातो. जर सुधारणा अपुऱ्या असतील किंवा नागरी अथवा संरचनात्मक कामे सुरू असतील, तर प्रकरणानुसार अतिरिक्त मुदत देण्याची तरतूदही असल्याचे FDAने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com