Chief Justice Bhushan Gavai : आर्किटेक होण्याची इच्छा होती पण वकील झालो; सरन्यायाधीश गवईंनी सांगितला आयुष्यात टर्निंग पॉइंट ठरलेला किस्सा

Bhushan Gavai judge Journey : सरन्यायाधीशपदाच्या शपथेसाठी इतक्या मोठ्या संख्येने वकील वर्ग दिल्लीत उपस्थित राहिले असे इतिहासात पहिल्यांदाच पाहण्यास मिळाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Justice BR Gavai
Justice BR GavaiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईत बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडून देशाचे नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून भूषण गवई यांनी त्यांचा जीवनाचा संघर्षमय प्रवास उलगडून सांगितला. यावेळी त्यांनी काही भूतकाळातील प्रसंग सांगितले. सरन्यायाधीश गवई यांनी लहानपणी अमरावतीपासून सुरू झालेला प्रवास, नागपूर आणि मुंबई-दिल्लीतील अनेक घडामोडी विस्तृतपणे सांगितल्या. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भाषणादरम्यान अमरावतीचे सुपूत्र भूषण गवई भावुक झाले.

भारताच्या सरन्यायाधीशपदाची भूषण गवई (Bhushan Gawai) यांनी14 मेला शपथ घेतली. त्यादिवशी महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने जे प्रेम दिले, त्याने मी भारावून गेलो आहे. शपथविधीसाठी इतक्या मोठ्या संख्येने वकिलवर्ग दिल्लीला उपस्थित होता. सरन्यायाधीशपदाच्या शपथेसाठी इतक्या मोठ्या संख्येने वकील वर्ग दिल्लीत उपस्थित राहिले असे इतिहासात पहिल्यांदाच पाहण्यास मिळाले, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Justice BR Gavai
NCP Vs Jayant Patil : राष्ट्रवादी राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत? जयंत पाटलांसह विश्वजीत कदमांच्या जवळच्या नेत्यांना फोडण्याच्या रणनीतीला वेग

अमरावतीमधून माझ्या प्रवासाची सुरुवात झाली. लहानपणी नगरपरिषद शाळा क्रमांक 8 येथून माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली. आज मी जो काही आहे, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जितका सहभाग तितकाच माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्काराचा हात असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Justice BR Gavai
Uddhav Thackeray reaction : ‘स्वर्गातील नरक’वरून राजकारण तापलं ! पुस्तक वाचताच उद्धव ठाकरेंची घणाघाती प्रतिक्रिया; थेट म्हणाले...

सुरुवातीला मला आर्किटेक होण्याची इच्छा होती. मात्र वकील होण्याची इच्छा नव्हती. मात्र वडिलांना त्यांच्या लहानपणी वकील व्हायचे होते. मात्र, एलएलबीच्या परीक्षेदरम्यान बाबा सत्याग्रहात अटक झाल्यामुळे ते तुरुंगात होते. त्यांची इच्छा मी पूर्ण करावी, असे त्यांना वाटत होते. त्यांचा आदेश मी मान्य केला आणि एलएलबीला प्रवेश घेतला. केसी महाविद्यालयात पदवी आणि सरकारी लॉ कॉलेजमध्ये एलएलबीचे शिक्षण घेतले. त्यानंतर आम्ही पुन्हा अमरावतीला शिफ्ट झालो. त्यावेळी पंजाबराव लॉ कॉलेजमध्ये विधीचे पुढील शिक्षण घेतले असे सरन्यायाधीश गवईंनी आयुष्याला टर्निंग पॉइंट ठरलेला किस्सा सांगितला.

Justice BR Gavai
Uddhav Thackeray master plan : उद्धव ठाकरेंचा 'स्थानिक'च्या निवडणुकीसाठी 'मास्टर प्लॅन'; 'या' नेत्यावर सोपवली जिल्हानिहाय मोठी जबाबदारी

आई-वडिलांकडून कष्ट शिकलो

त्या काळी परिस्थिती घरची बेताची होती. वडील आंबेडकर चळवळीत सहभागी होते. त्यामुळे घराची जबाबदारी आईवर होती. त्यात एकत्रित परिवार होता. वडिलांचे अनेक नातेवाईक एकत्र राहत होते. माझी आई आणि वडिलांची सर्वात लहान बहीण, माझी आत्या सर्व जबाबदारी पेलवत होत्या. या सर्वांना पाहून मला जगण्याची प्रेरणा घरातून मिळाली. माझ्या जडणघडतीत सर्वात मोठं योगदान माझ्या वडिलांचे आहे.

Justice BR Gavai
Sanjay Raut : मोदी 200 देश फिरले, पण एकही पाठिशी नाही म्हणून ही नौटंकी करण्याची वेळ; राऊतांचा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com