
Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीने या निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार आहे तर महायुती स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे समजते.
शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुट्टीच्या निमित्ताने परदेशात गेले होते. सुट्टीहून मायदेशी परतातच ठाकरे नव्या जोमाने आता कामाला लागले आहेत. त्यासाठी त्यांनी आतापासूनच नेतेमंडळींच्या बैठकीचा धडाका लावला आहे. शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते, उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिवसेना भवन येथे शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात ही आढावा बैठक आयोजित केली होती. पदाधिकारी, खासदार, आमदारांना त्यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर नेते, उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
या बैठकीवेळी स्थानिक पातळीवर कोणते मतदार संघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल 19 जूनपर्यत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.
या नेते मंडळींकडे स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का? याची माहिती तसेच 2012 आणि 2017 च्या महापालिकेच्या मतदार संघात कोणत्या स्थितीत आहेत ? याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आले आहे.
नेत्याकडे असणारी जिल्हानिहाय जबाबदारी पुढीलप्रमाणे :
1. सुभाष देसाई, राजन विचारे : ठाणे, नवी मुंबई, मीरा भायंदर -
2. संजय राऊत : पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव, जळगाव शहर, अहिल्यानगर
3. अनिल परब : धुळे, कल्याण - डोंबिवली
4. अनंत गिते : उल्हासनगर, पनवेल शहर
5. अरविंद सावंत : अमरावती, अकोला
6. भास्कर जाधव : नागपूर, चंद्रपूर
7. विनायक राऊत : वसई - विरार शहर, भिवंडी निजामपूर शहर
8. चंद्रकांत खैरे: लातूर, सोलापूर
9. अंबादास दानवे : परभणी, जालना, नांदेड-वाघाळा शहर
10. सुनील प्रभू : कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज आणि कुपवाड -
11. चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, अनिल देसाई: छत्रपती संभाजीनगर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.