NCP Politics : "OBC च्या नावावर दुकानदारी बंद करा...", छगन भुजबळांविरोधात अजितदादांचे नेते आक्रमक

Chhagan Bhujbal Vs Ajit Pawar : "छगन भुजबळ यांना जितकी संधी आत्तापर्यंत मिळाली तितकी संधी महाराष्ट्रातील कुठल्याही ओबीसी (OBC) नेत्याला मिळाली नाही. छगन भुजबळांना मोठं करण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आणि आता त्यांच्याच फोटोला चपला मारण्याचा प्रकार केला जात आहे. याची लाज वाटली पाहिजे."
Chhagan Bhujbal Vs Ajit Pawar
Chhagan Bhujbal Vs Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 18 Dec : महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच नागपूर येथे पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर (Mahayuti Cabinet Expansion) मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली. पूर्वी मंत्री राहिलेल्या अनेक नेत्यांना यंदा मंत्रिपद नाकारण्यात आलं आल्यामुळे अनेक नेत्यांनी उघड उघड नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना देखील मंत्रिपद नाकारण्यात आलं आहे. त्यामुळे भुजबळ आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहेत. पुण्यामध्ये देखील भुजबळ यांना मंत्रिपद नाकारल्याने ओबीसी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. यावेळी अजित पवारांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.

यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत. दीपक मानकर म्हणाले, "छगन भुजबळ यांना जितकी संधी आत्तापर्यंत मिळाली तितकी संधी महाराष्ट्रातील कुठल्याही ओबीसी (OBC) नेत्याला मिळाली नाही.

छगन भुजबळांना मोठं करण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आणि आता त्यांच्याच फोटोला चपला मारण्याचा प्रकार केला जात आहे. याची लाज वाटली पाहिजे याचे उत्तर संबंध महाराष्ट्रात देऊ, असा इशारा मानकर यांनी दिला आहे. महाराष्ट्रात भुजबळ एकटे ओबीसीचे नेते नाहीत.

Chhagan Bhujbal Vs Ajit Pawar
Ajit Pawar : नागपुरात असूनही अजितदादांची अधिवेशनाकडे पाठ; 'नॉट रिचेबल' राहण्याचा 'एजन्सी'चा सल्ला? चर्चांना उधाण

अजित पवार यांच्या पक्षाला मिळालेल्या 10 मंत्रिपदांपैकी चार मंत्रिपद ही ओबीसी नेत्यांना देण्यात आली आहेत. तर महायुतीचा विचार केल्यास 15 ओबीसी नेत्यांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत. फार मोठ्या प्रमाणात ओबीसी नेत्यांना संधी मिळालेली आहे. छगन भुजबळांचे पुत्र पंकज भुजबळ यांना दोन महिन्यापूर्वी विधानपरिषदेवर आमदार केलं आहे.

यावरून मानकरांनी भुजबळांवर निशाणा साधला, ते म्हणाले, "सगळीच पद तुम्हाला घरात हवी आहेत का? भुजबळ यांचे कार्यकर्ते जर अशा पद्धतीने निदर्शन करत असतील तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, त्यांना जशास तसे उत्तर महाराष्ट्रभर दिले जाईल. पोस्टरला चपला मारण्याचे जे प्रकार होत आहेत, ते करू नका ही आमची वॉर्निंग आहे", असं मानकर यावेळी म्हणाले.

Chhagan Bhujbal Vs Ajit Pawar
Sanjay Raut : 'भविष्यात शिंदे-अजितदादा...'; ठाकरे-फडणवीसांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं मोठं भाकीत

शिवाय भुजबळांच्या कार्यकर्त्यांना आम्ही कशाप्रकारे उत्तर देऊ शकतो हे चांगलेच माहिती आहे. त्यामुळे त्यांनी हिशोबात राहावं. आणि भुजबळांनी ओबीसीच्या नावावर दुकानदारी बंद करावी ते एकटेच ओबीसीचे नेते नाहीत, अशा शब्दात मानकर यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com