Gokul Gite : अपक्ष जिंकलेले गोकुळ गीते आता एकनाथ शिंदेंचेच 'खास'; सहयोगी झालेच पण लवकरच शिवसेनेत प्रवेश!

Gokul Gite Mlc: निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच गोकुळ गिते यांनी मुंबईतील 'नंदनवन' निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
Gokul Gite Joins Eknath Shinde :
Gokul Gite Joins Eknath Shinde :sarkarnama
Published on
Updated on

Gokul Gite News : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून दणदणीत विजय मिळवलेले गोकुळ गीते आता अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सहयोगी सदस्य झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी शिंदेंच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव केला.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच त्यांनी मुंबईतील 'नंदनवन' निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आगामी काळात शिवसेनेत जाण्याची संधी मिळाली तर आपण शिवसेनेसोबत जाऊ, असे देखील गिते यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात गीते हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गीते यांनी सांगितले की, त्यांनी सुरुवातीला शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु उपमुख्यमंत्री दिलेल्या शब्दामुळे त्यांनी दराडेंना उमेदवारी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली

पुढे बोलताना ते म्हणाले की, "मी एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या शैलीवर आणि त्यांच्या 'कमिटमेंट'वर प्रभावित आहे. तसेच त्यांनी स्पष्ट केले की ते भाजपचे सक्रिय सदस्य नव्हते, मात्र त्यांच्या कुटुंबाचे भाजपशी जुने संबंध आहेत. कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे आणि मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे देखील स्पष्ट केले.

Gokul Gite Joins Eknath Shinde :
Gokul Gite : नाशिकचे नवनिर्वाचित आमदार गोकुळ गीते शिवसेनेच्या ताफ्यात : एकनाथ शिंदे अन् उदय सामंत यांनी अवघ्या 12 तासांत फिरवली सूत्र

पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार

भविष्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी पक्ष जी काही जबाबदारी देईल, ती पूर्ण ताकतीने पार पाडण्याची ग्वाही देखील गोकुळ गीते यांनी यावेळी दिली. या निर्णयामुळे नाशिकच्या राजकारणात शिंदे सेनेचे पारडे जड झाले असून आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा बदल मानला जात आहे. दरम्यान,खासदार श्रीकांत शिंदे यांनी गोकुळ गीते यांचे स्वागत करताना सांगितले की, निवडणुकीत हार-जीत होत असते, परंतु गीते यांनी कोणत्याही अटीशिवाय शिंदे साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून सहयोगी सदस्य म्हणून येण्याची इच्छा व्यक्त केली, ही आनंदाची बाब आहे.

Gokul Gite Joins Eknath Shinde :
Gokul Gite Nashik MLC : विजयानंतर गोकुळ गिते शिवसेनेच्या वाटेवर? एकनाथ शिंदेंनी तातडीने मुंबईत बोलावून घेतलं, स्पेशल विमान धाडलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com