Gokul News: प्रशासक काळातील 70 कोटींची तूट ग्राहकांच्या माथ्यावर, गोकुळचं दूध 6 रुपयांनी महागलं, इतिहासातील विक्रमी वाढ

Kolhapur Gokul : गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठी ऐतिहासिक वाढ गोकुळच्या नवीन संचालक मंडळांनी केली असून त्याचा फटका आता ग्राहकांना बसणार आहे. गोकुळच्या म्हैस विक्री दुधामध्ये प्रति लिटर सहा रुपयांची तर गायीच्या प्रतिलिटर दुधामागे चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Gokul Board Meeting
Gokul Board MeetingSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. मात्र ग्राहकांना मात्र या निर्णयाचा फटका बसणार आहे. प्रशासक काळातील ७० कोटींची तूट भरून काढण्यासाठी गोकुळ दूध संघाने प्रतिलिटर सहा रुपयांचा बोजा ग्राहकांच्या माथ्यावर मारला आहे.

गेल्या दहा वर्षांतील सर्वात मोठी ऐतिहासिक वाढ गोकुळच्या नवीन संचालक मंडळांनी केली असून त्याचा फटका आता ग्राहकांना बसणार आहे. गोकुळच्या म्हैस विक्री दुधामध्ये प्रति लिटर सहा रुपयांची तर गायीच्या प्रतिलिटर दुधामागे चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) कडून दुग्ध व्यवसायाला बळ मिळावे आणि दूध उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी संघाने म्हैस व गाय दूध खरेदी दरात वाढ करून दूध उत्पादकांना दिलासा देणारा हा निर्णय घेतला आहे.

21 नोव्हेंबर 2026 पासून म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर 3 रुपये, तर गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर 2 रुपये वाढ करण्यात आली आहे. म्हैस दूध खरेदी दरात करण्यात आलेली प्रति लिटर 3 रुपयांची वाढ ही गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक दरवाढ आहे. या निर्णयामुळे संघाचे दूध संकलन वाढण्यास मदत होणार आहे.

Gokul Board Meeting
Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा काँग्रेस, अभिजीत दिपके यांना मोठा दणका, रामलीला मैदान, कनॉट प्लेस परिसरातील आंदोलन भोवलं

यानुसार 6.0 फॅट व 9.0 एस.एन.एफ. गुणप्रतिच्या म्हैस दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर 55.00 रुपयांवरून 58 रुपये, तर 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ. गुणप्रतिच्या गाय दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर 37 रुपयांवरून 39 रुपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे चौदा कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे.

यावर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्याने तसेच काही भागात पावसाचे प्रमाण कमी-जास्त असल्याने चाऱ्याच्या उपलब्धतेवर आणि पशुधनाच्या दूध उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे दूध संकलनातही चढ-उतार होत आहेत. या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि दुग्ध व्यवसाय सातत्याने सक्षम राहावा, यासाठी 'गोकुळ'ने दूध खरेदी दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

Gokul Board Meeting
OBC Government Decisions : OBC समाजासाठी मोठा निर्णय! विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागणार, तब्बल 6,840 कोटींची शिफारस; मंत्री बावनकुळेंची घोषणा!

दरम्यान, गोकुळच्या म्हैस दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 6 रुपयांची व गाय दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 4 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 21 नोव्हेंबर पासून मध्यरात्री पासून लागू होणार आहे. गेल्या वर्षाभरामध्ये गोकुळने दुधउत्पादकांसाठी दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली. परंतु त्या प्रमाणात दूध विक्री दरामध्ये वाढ करण्यात आली नव्हती त्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.

गोकुळशी संलग्न सुमारे 8 हजार 200 प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून सध्या प्रतिदिन सरासरी 17 ते 18 लाख लिटर दूध संकलित केले जाते. दूध उत्पादक हे गोकुळचे केंद्रबिंदू असून, त्यांच्या दुग्ध व्यवसायाला स्थैर्य मिळावे आणि उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी संघ सातत्याने प्रयत्नशील आहे.

Gokul Board Meeting
Congress politics : काँग्रेसमधील काही नेत्यांमुळेच मोदी जेलमध्ये जाण्यापासून वाचले! बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ, कोण होते ते नेते?

दरम्यान, जसा गोकुळला दूध उत्पादक महत्त्वाचा आहे तसा ग्राहक देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक झळ बसणार नाही याचा विचार करून निर्णय घेण्याच्या सूचना समविचारी आघाडीच्या संचालकांनी केला होता. शिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील खरेदी दरामध्ये वाढ देण्याची विनंती केली. त्यानुसार दूध उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय महायुतीच्या संचालक मंडळाने घेतला. मात्र ग्राहकांना मात्र सहा रुपयांचा भार प्रतिलिटर विक्री दुधामागे ठेवण्यात आला आहे.

सध्या म्हैस प्रतिलिटर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 72 रुपये इतके आहे. ते आता 78 रुपये होणार आहे. तर गाय प्रतिलिटर दूध 54 रुपये इतके आहे तर ते आता 60 रुपये इतके होणार आहे. तर बाहेरील पुणे मुंबईमध्ये म्हैस प्रतिलिटर दूध हे 78 रुपये आहे ते आता 84 रुपये इतके होणार आहे. तर गाय प्रति लिटर दूध 60 रुपये होते ते आता 66 रुपये इतके होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.