Padalkar VS Awhad : गोपीचंद पडळकर, जितेंद्र आव्हाड अडचणीत, विधानसभा हाणामारी प्रकरणी अहवाल तयार; कठोर कारवाई होणार!

Assembly Lobby Clash Report : पावसाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या लाॅबीमध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक भिडले होते. त्याचा अहवाल विशेष अधिकार हक्क भंग समितीने तयार केलेला आहे.
Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar
Jitendra Awhad Vs Gopichand Padalkarsarkarnama
Published on
Updated on

Assembly Winter Session : पावसाळी अधिवेशनामुळे विधीमंडळाच्या लाॅबीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक भिडले होते. त्यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. या प्रकरणी पडळकर समर्थक ऋषिकेश टकले आणि आव्हाड समर्थक नितीन देशमुखांविरुद्ध मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

विधीमंडळाच्या लाॅबीत झालेल्या हाणामारीची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली होती. या प्रकरणी विशेष अधिकार हक्क भंग समितीकडून चौकशी करून अहवाल तयार करण्यात आला आहे.

हा अहवाल आज (बुधवार) विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला जाणार आहे.तसेच गुरुवारी हा अहवाल सभागृहात ठेवला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे समर्थकांमुळे आव्हाड आणि पडळकर अडचणीत आल्याची चर्चा आहे. साम टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या अहवालानंतर राज्यशासनाकडून या प्रकरणी कठोर पावले उचलली जाणार आहे.

Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar
MNS cash bomb: मनसेकडून ‘कॅश बॉम्ब’ची मालिका सुरुच! संदीप देशपांडेंकडून PWD अधिकाऱ्याचा लाच घेतानाचा VIDEO शेअर

आमदारांकडूनच सुरक्षाभंग

आव्हाड-पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्राथमिक चौकशीत या दोन्ही आमदारांनी आपल्या समर्थकांना विधीमंडळात प्रवेश देताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तब्बल 15 आमदारांकडून आपला समर्थकांना विधीमंडळात प्रवेश देताना नियमभंग झाल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे.

Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar
Nashik Simhastha land expansion protest : साधुग्रामला इंच वाढीव जागा देणार नाही; सरकारचं 1200 एकर जमीन आरक्षित करण्याचं धोरण, आता शेतकरी कृती समिती आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com