Dhananjay Mahadik on Congress : "देशात अराजकता माजवण्याचा काँग्रेसचा कट फसला!" भाजप खासदार महाडिक यांचा घणाघाती आरोप

Mahadik says Congress failed to create unrest: भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवर देशात अराजकता निर्माण करण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणातील संपूर्ण राजकीय घडामोडी वाचा.
BJP MP Dhananjay Mahadik attacks Congress
BJP MP Dhananjay Mahadik attacks CongressSarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Mahadik on Congress: नीट परीक्षेवरून देशात सुरू झालेल्या आंदोलनाला विद्यार्थ्यांना यश मिळाले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काँग्रेस सह विरोधी पक्षाने उडी घेतल्यानंतर भाजपकडून नेत्यांना टार्गेट केले जात आहे. काँग्रेसच्या विरोधात भाजपच्या खासदारांनी संसदेसमोर निदर्शने केली. अशातच भाजपचे नेते आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे.

तर खासदार महाडिक यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष करत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन स्थगित करायला हवे होते. आंदोलन संपल्यानंतरही मोर्चा काढण्यामागे केवळ राजकीय पोळी भाजण्याचा उद्देश होता, अशी टीका केली.

BJP MP Dhananjay Mahadik attacks Congress
Bhaskar Bhagare on CJP : विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी गुंडांचा वापर? खासदार भास्कर भगरेंचा घणाघात; संसदेत आवाज उठवणार!

नीट परीक्षा प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ही प्रमुख मागणी घेऊन दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा वापर करून देशात अराजकता निर्माण करण्याचा काँग्रेससह आप, समाजवादी पक्षाचा डाव होता. मात्र भाजपाने जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांचे राजीनामे दिले.

त्यामुळे काँग्रेसचे देशात अराजकता पसरवण्याचे स्वप्न अखेर धुळीस मिळाला. विद्यार्थ्यांचे आंदोलन हायजॅक करून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी केला.

BJP MP Dhananjay Mahadik attacks Congress
MPSC Recruitment 2026 : MPSC चा पेपर फुटला? विद्यार्थ्यांची थेट आयोग अन् अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

आंदोलनात असामाजिक घटक आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाल्याने मूळ उद्देश बाजूला पडला. राहुल गांधी, काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्ष यांना हे आंदोलन दीर्घकाळ पेटते ठेवून देशभर वाद, संघर्ष आणि अराजकता निर्माण करायची होती. मात्र, सरकारने योग्य वेळी निर्णय घेतल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com