

Hasan Mushrif News : गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या निवडणुकीदरम्यान झालेली जुगलबंदी आणि नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष चांगलाच चर्चेत राहिला. सतेज पाटलांनी काढलेल्या संघर्ष मोर्चानंतर महायुतीच्या सभेत देखील प्रत्युत्तर देण्यात आले होते. या सभेत वापरेल्या भाषेवरून देखील वाद झाला होता.
यावर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी मौन सोडले आहे. रागापोटी आमच्या तोंडातून काही वाक्य गेलं वास्तविक ती वाक्य जायला नको हवी होती. गोकुळचा विषय हा आमच्या दृष्टीने संपलेला आहे, असे ते म्हणाले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, युतीत सहभागी झालो त्यावेळीच सतेज पाटील आणि आम्ही वेगवेगळे झालो.राजकारण मैत्री व शत्रू हे कधीच असू शकत नाहीत. मैत्री ही मैत्री असते, पण ज्यावेळी राजकारण करायचे असते त्यावेळी मतभेद असतात. पण या निवडणुकीत प्रचार करून वेगळं वळण लावायचा प्रयत्न झाला त्या चुकीचे झाले.
सतेज पाटील आणि मी जानीदुश्मन नाही. कधी एकमेकांसमोर आले तर नमस्कार चमत्कार होणार. वयाने लहान असल्यामुळे त्यांना मला नमस्कार करावा लागणार आहे, असे देखील त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना सांगितले की, अध्यक्ष निवड होत असताना सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चा काढला. लोकशाहीने त्यांना हा अधिकार दिलेला आहे, त्यांचा तो हक्क आहे. राजकीय खुन्नस आणि विकृतपणाचा कळस गाठणारा हा मोर्चा होता. जो काही प्रकार घडला त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चिड निर्माण झाली. अनेक भडक वक्तव्य या मोर्चामध्ये करण्यात आली. यातच प्रतिबिंब आमच्या विजयसभेत उमटले. रागापोटी आमच्या तोंडातून काही वाक्य गेलं वास्तविक ती वाक्य जायला नको हवी होती. गोकुळचा विषय हा आमच्या दृष्टीने संपलेला आहे.
विरोधी नेते वारंवार सांगत होते की कोरम अध्यक्ष निवडीसाठी लागणार नाही. मात्र यासाठी ते कोर्टात गेले. कोर्टाने त्यांचं म्हणणे ऐकून घेणे गरजेचे होतं. तसा निकाल देणे गरजेचे होतं. मात्र हा कोरमच सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे. त्यामुळे यासाठी कायदाच बदलावा लागतो.
विजय सभेत झालेली भाषण ही स्वाभाविक चीड होती. समोरून काही वक्तव्य आली त्यामुळे ही चीड निर्माण झाली होती. याबाबत जी वक्तव्य आमच्याकडून जायला नको हवी होती ती गेलीत याबाबत आमच्याकडून दिलगिरी व्यक्त केलेली आहे. झालेल्या भाषणाचं मी समर्थन करणार नाही. संजय राऊत आणि रवींद्र धोंगेकर यांचा गोकुळ संदर्भात बोलण्याचा संबंध काय? यांना बोलण्यासाठी सुपारी दिली आहे की काय? आमच्या जिल्ह्यात काय सुरू आहे याला आम्ही समर्थ असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.