

kolhapur news : निवडणूक जाहीर झाल्यापासून ते अध्यक्ष निवड होईपर्यंत भाजपमधील अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत महायुतीने गोकुळ दूध संघावर वर्चस्व मिळवले असले तरी भाजपचे सहयोगी सदस्य शिवाजीराव पाटील यांची भाजप नेत्यांच्या बाबतीत नाराजी कायम आहे. सातत्याने आमदार पाटील यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांवर तोफ डागली. तर अध्यक्ष निवडीनंतर ही मंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्ह्याबाहेरील एका नेत्यांवर खापर फोडत 'सरकारनामा'शी बोलताना आमदार शिवाजी पाटील यांनी झालेल्या प्रकाराबाबत खंत व्यक्त केली.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. निवडणुकीत समविचारी आघाडीला बहुमत मिळाले असले, तरी कायद्यातून पळवाट काढत महायुतीने अखेर गोकुळ दूध संघावर अध्यक्ष बसवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील चुयेकर यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडीनंतर सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात असतानाच वातावरण चांगलेच तापले आहे.
मंत्री चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant patil) विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. चंद्रकांत पाटील जर भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि जिल्ह्याबाहेरील नेत्यांचे ऐकून वागले नसते तर आज भाजपचे वाटोळे झाले नसते, अशा शब्दांत आमदार शिवाजी पाटील यांनी घरचा आहेर दिला आहे.
आता जे घडले ते जनतेला मान्य होईल का नाही, हे माहिती नाही? चंद्रकांत पाटील व जिल्ह्याबाहेरील नेत्याने हे भाजपला (BJP) खूप मागे नेऊन ठेवले आहे, हे नाकरता येत नाही. जिल्ह्याबाहेरील लोकांनी ढवळाढवळ थांबावली तर भाजपच्या दृष्ठीने बरे होईल, असेही आमदार पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.