Maharashtra Rain: महाराष्ट्रात अनेक भागात दमदार पाऊस! 'या' नव्या चक्रीवादळानं राज्यात आणखी पावसाचा इशारा

Maharashtra Rain: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल दुपारपासून पाऊस सुरु आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या अर्णब चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचं सांगितलं जात असलं तरी आणखी एक चक्रीवादळानं महाराष्ट्राला तडाखा दिला आहे.
rain .jpg
rain .jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Rain: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल दुपारपासून पाऊस सुरु आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या अर्णब चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचं सांगितलं जात असलं तरी आणखी एक चक्रीवादळानं महाराष्ट्राला तडाखा दिला आहे. त्यामुळं महाराष्ट्राचा बहुतांश भागात सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. यामुळं दुष्काळामुळं पाणी टंचाईचा फटका बसलेल्या अनेक ठिकाणी दिलासा मिळालेला असला तरी अनेक ठिकाणी पिकांचंही नुकसान झाल्याच्या बातम्या येत आहेत.

विजांच्या कडकडाटासह पाऊस

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात अनेक ठिकाणी सध्या पाऊस सुरुच आहे. पण येत्या दोन दिवसांत आणखी दमदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात पावसाचा यलो अलर्ट जारी हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.

rain .jpg
Drought Relief: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव; कृषी नुकसान भरपाईसाठी १५ हजार ३८६ कोटींची मागणी

अर्णबनंतर 'मुरासू' चक्रीवादळ

राज्यातील पावसाची ही सर्व स्थिती 'मुरासू' या नव्या चक्रीवादळामुळं निर्माण झाल्याचं हवामान खात्यानं सांगतलं आहे. मुरासू (Murasu) हे बंगालच्या उपसागरातील सध्या निर्माण झालेलं तीव्र चक्रीवादळ आहे. अर्णब चक्रीवादळानंतर अवघ्या आठवड्यात निर्माण झालेले हे दुसरे चक्रीवादळ आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) याला ‘मुरासू’ असं नाव दिले आहे. हे नाव भारताने सुचवलं असून, तमिळ भाषेत ‘मुरासू’ म्हणजे युद्धाचा नगारा/ढोल (war drum) असा याचा अर्थ होतो.

मुरासूची सध्याची स्थिती

हे वादळ पश्चिम-मध्य आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. ते वायव्य दिशेने सरकत असून, २ नोव्हेंबर रात्री ११:३० ते ३ नोव्हेंबर पहाटे ४:०० या दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर नेल्लोर आणि नरसपूर दरम्यान, ओंगोले जवळ धडकण्याची शक्यता आहे. ज्यावेळी हे चक्रीवादळ किनाऱ्याला धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी १००-११० किमी असू शकतो.

rain .jpg
Shalarth Portal: 'शालार्थ'मध्ये घोळ! 3,625 शाळांमध्ये अतिरिक्त कर्मचारी; शिक्षण विभागाचा दणका, वेतन अडकले,15 नोव्हेंबरची डेडलाइन

मुरासूचे संभाव्य परिणाम

मुरासू चक्रीवादळामुळं आंध्र प्रदेश, उत्तर तमिळनाडू, तेलंगणा आणि इतर भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळं किनारपट्टीवर वादळी वारे, समुद्राच्या उंच लाटा आणि पूरसदृश स्थिती निर्माण होऊ शकते. चेन्नई आणि आंध्रच्या काही जिल्ह्यांत शाळा-कॉलेजे बंद ठेवण्यात आली आहेत. या भागांमध्ये हवामान खात्यानं रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.