
Mumbai News : हिंदी सक्तीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कडवट भूमिका घेतल्यानंतर सरकारला झूकावे लागले आहे. राज्य सरकारने त्रिभाषासह हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्याने आता उत्तर भारतीयांकडून राज ठाकरेंवर टीका होताना दिसत आहे. तर विजयी मेळाव्यानंतर थेट ओपन चॅलेंज दिले जातायेत. यात आता एका भोजपुरी अभिनेत्याची भर पडली असून दिनेश लाल यादव याने थेट हिंदीचा मुद्दा उचलून धरला आहे. त्याने, 'मला मराठी बोलता येत नाही, दम असेल मला महाराष्ट्रातून घालवून दाखवा, असे चॅलेंज दिलं आहे. ज्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा हिंदीविरूद्ध मराठी असा वाद होऊ शकतो. (Hindi actor challenges Raj Thackeray over not speaking Marathi sparking competition among North Indians and its implications for Maharashtra politics)
राज सरकारने पहिलीपासून 12 वीपर्यंत त्रिभाषा सूत्र लागू करत हिंदी सक्ती केली होती. ज्याला ठाकरे बंधूंनी कडाडून विरोध केला होता. यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचाही समावेश होता. अजित पवार यांनी या निर्णयाला आपला वैयक्तिक विरोध असल्याचे म्हटले होते. पण सरकार निर्णय मागे घेताना दिसत नव्हते. यावरून 5 जुलै रोजी मोठ्या मोर्चाची तयारी करण्यात आली होती. पण त्याआधीच राज्य सरकारने हे दोन्ही निर्णय रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ज्यानंतर 5 जुलै रोजी विजयी मेळावा घेण्यात आला. यामेळाव्यात देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी, मराठी भाषेला धक्का लागू देणार नाही, अशी भूमिका घेत मराठी आलीच पाहिजे असा इशारा उत्तर भारतीयांना दिला.
यावरूनच आता उत्तर भारतीय नेत्यांसह अभिनेत्यांकडून याला विरोध होताना दिसत आहे. स्वीमी आनंद स्वरुप असो की बिहारच्या जन अधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. त्यापाठोपाठ आता भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव याने ठाकरे बंधूंना चॅलेंज दिलं आहे.
भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव याने, हिंदीचा मुद्दा उचलून धरत, 'मला मराठी बोलता येत नाही, दम असेल तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असं आव्हान ठाकरे बंधूंना दिलं आहे. तसेच त्याने महाराष्ट्रात मराठी बोलण्याच्या सक्तीवर देखील नाराजी व्यक्त केली आहे.
यावेळी अभिनेता यादव म्हणाला, मला मराठी येत नाही, मी बोलत नाही. मला भोजपुरी येते. तुमच्यात हिम्मत असेल तर मला महाराष्ट्राबाहेर हाकलवून दाखवाच! तुम्ही गरिबांनाच का लक्ष्य करता? तुम्ही हिंदीला विरोध करणारे लोक असून तुम्ही फुटीरतेचे राजकारण करत आहात. भारत हा विविध भाषा आणि संस्कृतींनी नटलेला देश असून येथे भाषेच्या नावावर द्वेष किंवा हिंसा होऊ शकत नाही.
पण आता अशा पद्धतीने थेट राज ठाकरेंना चॅलेंज दिल्यानंतर अभिनेता यादव याला शिवमनसैनिक महाराष्ट्रात टिकू देतात का ते पाहावं लागणार आहे. कारण मिरा रोड येथे एका उत्तर भारतीय दुकानदाराला मराठीवरून मनसे कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीवरून सुशील केडिया या उद्योजकाने राज ठाकरेंवर टीका केली होती. तसेच खुले आव्हानही दिले होते. पण जेव्हा त्याच्या कार्यालयाची तोडफोड झाली त्यानंतर त्याने समाजमाध्यमांवर याबद्दल जाहीर माफीही मागितली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.