Maharashtra Congress president Harshvardhan Sapkal pays tribute at late Rajiv Satav’s memorial in Kalamnuri before launching the Shetkari Sangharsh Padayatra in Hingoli district.
Maharashtra Congress president Harshvardhan Sapkal pays tribute at late Rajiv Satav’s memorial in Kalamnuri before launching the Shetkari Sangharsh Padayatra in Hingoli district.Sarkarnama

Congress News : काँग्रेस हिंगोलीत कमबॅकच्या तयारीत; प्रज्ञा सातव, अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतर प्रदेशाध्यक्षच मैदानात!

Harshvardhan Sapkal Hingoli News : प्रज्ञा सातव आणि अशोक चव्हाण भाजपात गेल्यानंतर हिंगोलीत काँग्रेस कमजोर झाली. आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शेतकरी संघर्ष पदयात्रेतून पक्ष संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Published on

Congress News : दिवंगत काँग्रेस नेते व माजी खासदार राजीव सातव यांनी पक्षाची हिंगोली जिल्ह्यात मजबूत बांधणी केली होती. परंतु त्यांच्या अकाली निधनानंतर ही बांधणी काहीसी सैल झाली. पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना एकदा नाही तर दोनदा विधान परिषदेवर संधी दिली. पण काँग्रेस पक्षाची नव्याने बांधणी करण्यात त्यांना यश तर आलेच नाही, उलट त्यांनी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला. आता हिंगोलीत कमबॅक करण्यासाठी स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मैदानात उतरले आहेत.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व हिंगोलीत संघटनात्मक बाबींमध्ये लक्ष घालणारे अशोक चव्हाण हे ही 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपामध्ये गेले. या सगळ्याचा परिणाम हा हिंगोली शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्ष दुबळा होण्यात झाला. प्रज्ञा सातव यांना पक्षाने संधी आणि निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिल्यानंतरही कार्यकर्त्यांची मोट बांधण्यात त्यांना यश आले नाही. शिवाय नुकताच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला.

पक्षाने सगळं काही देऊन प्रज्ञा सातव यांनी काँग्रेससोबत गद्दारी केल्याचा आरोप पक्षाचे निष्ठावंतांनी केला. पक्षाची घडी विस्कटलेली असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंगोलीत लक्ष घालून काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आज (ता.9) हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे दिवंदत राजीव सातव यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघर्ष पदयात्रेला सुरुवात करण्यात आली.

Maharashtra Congress president Harshvardhan Sapkal pays tribute at late Rajiv Satav’s memorial in Kalamnuri before launching the Shetkari Sangharsh Padayatra in Hingoli district.
Congress News: भाजपचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांना बालेकिल्ल्यातच मोठा धक्का; एकाचवेळी जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार असो की राज्य सरकारने गरज नसलेल्या शक्तिपीठ महामार्गाचा घेतलेला निर्णय, यातून आपल्या राज्यातील शेतकर्‍यांच नुकसानच होणार आहे. यासारखे केंद्र व राज्य सरकारचे शेतकरी विरोधी निर्णय रद्द व्हावेत, या मागणीसाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. शेतकरी विरोधी धोरणांबद्दलचा राग यात्रेतून व्यक्त होत असल्याचा सपकाळ यांनी केला आहे.

Maharashtra Congress president Harshvardhan Sapkal pays tribute at late Rajiv Satav’s memorial in Kalamnuri before launching the Shetkari Sangharsh Padayatra in Hingoli district.
Ashok Chavan : मराठवाड्यासाठी मोठी बातमी : नांदेड-लातूर प्रवास होणार अवघ्या सव्वा तासात; अशोक चव्हाणांनी लावला जोर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, एससी सेलचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंभिरे, प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे, डॉ. सतीश पाचपुते, सुरेंद्र घोडसकर, मुजाहिद पठाण, आरिझ बेग, हिंगोली जिल्हाध्याक्ष सुरेशअप्पा सराफ यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com