Imtiaz Jaleel News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मोठी खळबळ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नावे 'टॅक्स'च्या बोगस पावत्या

Ramai Awas Scheme Scam : रमाई आवास योजनेतील घोटाळ्याच्या आरोपांमध्ये इम्तियाज जलील यांनी सादर केलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नावाच्या मालमत्ता कराच्या पावत्या बनावट असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Former MP Imtiaz Jaleel addressing the media over alleged Ramai Awas scheme scam, while municipal officials later claimed the property tax receipts presented as evidence were fake.
Former MP Imtiaz Jaleel addressing the media over alleged Ramai Awas scheme scam, while municipal officials later claimed the property tax receipts presented as evidence were fake.Sarkarnama
Published on
Updated on

Municipal Corporation News : 'रमाई आवास' योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सादर केलेल्या मालमत्ता कराच्या पावत्या बोगस असल्याचे समोर आले आहे. शहरात अशा प्रकारचे मालमत्तांचे क्रमांक नसल्याचे उपायुक्त तथा कर मुल्य निर्धारक विलास नवाळे यांनी सांगीतले. शहरात रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी केला होता.

हे आरोप करतांना त्यांनी यावेळी विविध पुरावेही प्रसारमाध्यमांना दिले. या योजनेत घर घेण्यासाठी दाखल प्रस्तावासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावाचे रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, मालमत्ता कराची पावती अशी कागदपत्रे जोडण्यात आलेली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आज (ता.13) याची जिल्ह्यासह राज्यात चर्चा होती. इम्तियाज यांनी केलेले आरोप ज्या नगरसेवकांची नावे देत केला होता, त्यांनीही ते फेटाळले.

यासंदर्भात उपायुक्त विलास नवाळे यांनी महापालिकेच्या मालमत्ता पावतीवर मालमत्ता क्रमांक नोंदवताना आधी झोनचे नाव व त्यासोबत त्या झोनमधील मालमत्तेची संख्या असते असे स्पष्ट केले. आर नावाने महापालिकेचा कोणताही झोन नाही. मालमत्ता क्र. आर 08549845 असा कोणताही क्रमांक नाही. तसेच ई 98545869 या नंबरची पावतीही बोगस आहे. महापालिकेचा ई झोन आहे, मात्र 98545869 एवढ्या मालमत्ता शहरातही नाहीत.

Former MP Imtiaz Jaleel addressing the media over alleged Ramai Awas scheme scam, while municipal officials later claimed the property tax receipts presented as evidence were fake.
Imtiaz Jaleel : रमाई आवास योजनेतील घोटाळ्यावरुन MIM, भाजपत जुंपली! भाजप नगरसेवकाचा जलील यांना इशारा; म्हणाले, मागासवर्गीयांची मतं...

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाच्या मालमत्ता कराच्या पावतीवर राहुल नगर, सादत नगर असा पत्ता आहे. मालमत्ता क्र. आर  08549845 असा आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 जून 2026 या कालावधीतील कराची एकूण देय रक्कम 1985 रुपये दाखविण्यात आलेली आहे.

Former MP Imtiaz Jaleel addressing the media over alleged Ramai Awas scheme scam, while municipal officials later claimed the property tax receipts presented as evidence were fake.
Aimim News : महापालिकेत सभागृह गाजवण्याआधीच 'एमआयएम'ची कोंडी, 'त्या' नगरसेवकांवर अपत्रातेची टांगती तलवार!

तर एकनाथ संभाजी शिंदे यांचा पत्ता आंबेडकर नगर दाखविण्यात आला असून, मालमत्ता क्र. ई 98545869 असा नोंदवलेला आहे. 4 जून 2025 ते 31 जून 2026 या कालावधीसाठीची मालमत्ता कराची चालू मागणी 1985 रुपये दाखविली आहे. एकूणच इम्तियाज जलील यांनी रमाई अवास योजनेच्या घोटाळ्यात सादर केलेले पुरावे हे बनावट असल्याचे समोर आले आहे. आता ते नमके तयार केले कोणी? या मागचा मास्टरमाईंड कोण? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com