Shivsena Politics : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीची ठिणगी! म्हस्केंच्या मुलालाच गोगावलेंच्या निकटवर्तीयाचा विरोध अन् जोरदार घोषणाबाजी

Thane Municipal elections : राज्यात नुकताच झालेल्या नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घराणेशाही दिसली होती.
Eknath Shinde Shivsena Politics; naresh mhaske And bharat gogawale
Eknath Shinde Shivsena Politics; naresh mhaske And bharat gogawalesarkarnama
Published on
Updated on
Summary
  • ठाणे महापालिका निवडणुकीआधी शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

  • आशुतोष म्हस्के यांच्या संभाव्य उमेदवारीला कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध आहे.

  • 35 वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या प्रमोद गोगावले यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाली.

Thane Municipal elections : घराणेशाहीविरोधात शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी पेटवलेली ठिणगी आता थेट खासदार नरेश म्हस्के यांच्या दारापर्यंत पोहोचली आहे. ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार होण्यापूर्वी नगरसेवक म्हणून ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व म्हस्के करीत होते, त्या प्रभागातून त्यांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत; मात्र याला शिवसेनेतूनच उघड विरोध होऊ लागला आहे.

नरेश म्हस्के हे शिवसेना एकसंध असताना कोपरीतील आनंदनगर भागातून सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येत होते. आता या प्रभागात उमेदवारीसाठी अनेक इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदारांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळताच वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचे दिसते.

शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे खंदे समर्थक आणि कार्यकर्ते प्रमोद गोगावले यांचाही नाराजांमध्ये समावेश आहे. त्यांच्या समर्थकांनी गोगावले यांना यंदा उमेदवारी मिळावी यासाठी थेट रस्त्यावर उतरून मागणी केली आहे.

Eknath Shinde Shivsena Politics; naresh mhaske And bharat gogawale
Municipal Election News : इचलकरंजीत मोठ्या घडामोडी; ठाकरेंकडून आघाडीला धक्का, महायुतीची ताकद वाढली...

आपण गेली 25 वर्षे प्रभागात काम करीत असल्याचा दावा प्रमोद गोगावलेंनी केला आहे. गेल्या दोन वेळा वरिष्ठांसाठी आपण इच्छुक असूनही माघार घेतली. मग आता तरी संधी देण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात गैर काय आहे, असे ते म्हणाले.

आपण पक्षाकडे इच्छुक म्हणून अर्ज दाखल केला आहे. आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, पण माझ्या कामाची दखल घेतली जावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपाची रस्सीखेच सुरूच आहे. त्यातच अनेक माजी नगरसेवक आपल्या मुलामुलींना राजकीय वारसदार म्हणून पुढे आणण्याच्या तयारीत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत आहे.

Eknath Shinde Shivsena Politics; naresh mhaske And bharat gogawale
Ahilyanagar Municipal Election : पहाटे 4 वाजेपर्यंत बैठक, तोडगा नाहीच; शिंदेंची शिवसेना अहिल्यानगरमध्ये वेगळ्याच मूडमध्ये!

FAQs :

1. ठाणे महापालिका निवडणुकीत वाद का निर्माण झाला?
उमेदवारी निवडीवरून शिंदे गटात अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत.

2. आशुतोष म्हस्के कोण आहेत?
ते खासदार नरेश म्हस्के यांचे पुत्र असून प्रभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

3. प्रमोद गोगावले यांना समर्थन का मिळत आहे?
ते गेल्या 35 वर्षांपासून प्रभागात सक्रियपणे पक्षासाठी काम करत आहेत.

4. कार्यकर्त्यांचा मुख्य आक्षेप काय आहे?
घराणेशाहीपेक्षा निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

5. या वादाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
शिंदे गटातील मतभेदांचा थेट फटका निवडणूक रणनीतीवर बसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com