Jay Pawar: सुनेत्रा पवारांवरील 'गुंगी गुडिया' टीकेवरुन जय पवारांचा काँग्रेसवर निशाणा; इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल

Sunetra Pawar: राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना काँग्रेस 'गुंगी गुडिया' संबोधल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे.
Sapkal_Jay Pawar_Sunetra Pawar
Sapkal_Jay Pawar_Sunetra Pawar
Published on
Updated on

Sunetra Pawar Controversy: राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना काँग्रेस 'गुंगी गुडिया' संबोधल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली. नेत्यांनी तर काँग्रेसवर टीका केलीच पण कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन शाईफेक केल्याचं समोर आलं आहे. यासर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता सुनेत्रा पवारांचे पुत्र जय पवार यांनी काँग्रेसला सुनावलं आहे. इन्स्टाग्रामवर स्टेट्सद्वारे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Sapkal_Jay Pawar_Sunetra Pawar
Harshwardhan Sapkal: "सुनेत्रा पवारांनी गुंगी गुडिया नाही, तर दुर्गा असल्याचे सिद्ध करावं" हर्षवर्धन सपकाळ यांचा युटर्न
Jay Pawar Insta Status
Jay Pawar Insta Status

जय पवारांच्या इन्स्टापोस्टमध्ये काय?

माननीय सुनेत्रा पवार यांच्याबाबत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या नेत्यांनी आपलेली भाषा ही केवळ एका व्यक्तीवर केलेली टीका नसून, निष्ठा, कठोर परिश्रम, जनसेवा आणि स्वतःच्या कर्तुत्वाच्या बळावर समाजात मानाचं स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सन्मानावर झालेला थेट आणि निषेधार्ह हल्ला आहे. माननीय सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. राजकीय मतभेद असू शकतात, परंतू महिलांचा सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यक्तीमत्वाला कमी लेखणारी अथवा त्यांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही सुसंस्कृत लोकशाहीत कधीही स्विकारली जाऊ शकत नाही. राजकारण हे विचारांचे, धोरणांचे, कामगिरीचे आणि जनतेच्या विश्वासाचे असते-महिलांचा अवमान करणाऱ्या शब्दांचे नव्हे. मतभेद जरुर असावेत पण ते तथ्य, सभ्यता, संयम आणि लोकशाही मुल्यांच्या चौकटीतच व्यक्त झाले पाहिजेत.

आज मी केवळ माझ्या आईच्या पाठीशी उभा नाही, तर स्वतःच्या कर्तुत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या भारतातील प्रत्येक महिलेच्या सन्मानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभा आहे. तिची राजकीय विचारधारा कोणतीही असो, तिचा सन्मान हा अबाधित आणि निर्वावाद राहिलाच पाहिजे. राजकारणात विजय-पराजय होतच राहतात, सत्ता बदलत राहते. पण महिलांचा सन्मान हा कोणत्याही पक्षापेक्षा, कोणत्याही नेत्यापेक्षा आणि कोणत्याही राजकीय संघर्षापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे प्रत्येक विधान केवळ निषेधार्हच नाही, तर लोकशाही संस्कृतीलाही काळीमा फासणारे आहे.

Sapkal_Jay Pawar_Sunetra Pawar
DK Shivkumar: कर्नाटकात काँग्रेस सरकारमध्ये धुसफूस! मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्यावर स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, राजकारणाचा भाग...

नेमका वाद काय?

महाराष्ट्र काँग्रेसनं ३ जुलै २०२६ रोजी एका वृत्तवाहिनीची व्हिडिओ क्लीप शेअर केली. यामध्ये पत्रकार परिषदेत माजी मंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसत आहेत. यावेळी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना बीडमधील गुन्हेगारीवर प्रश्न विचारल्यानंतर मुंडे यांनी हा प्रश्न मध्येच तोडत सुनेत्रा पवारांना उत्तर देऊ दिलं नाही. उलट पत्रकार परिषद संपलेली नसतानाच ती गुंडाळली. त्यामुळं हा व्हिडिओ शेअर करत "धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा आहेत का? असा सवाल विचारत...सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील?" असाही सवाल काँग्रेसनं विचारला.

पण काँग्रेसच्या या प्रश्नामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली आणि काँग्रेस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया कसं काय म्हणू शकतात म्हणून राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. काँग्रेसच्या या विधानामुळंच या पक्षाचा शेवट होईल अशी टोकाची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली. तर कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करत तिथं लावलेल्या काँग्रेस नेत्यांच्या पोस्टरवर शाईफेक करत आपला निषेध नोंदवला.

सपकाळांचा सल्ला

काँग्रेसच्या या सवालामुळं राजकीय वातावरण तापल्यानं पुढे येत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं की, आमची सुनेत्रा पवारांवर केलेली टिप्पणी त्यांनी सकारात्मक पद्धतीनं घेतली पाहिजे. कारण पूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देखील तत्कालीन विरोधीपक्षातील नेत्यांनी गुंगी गुडिया असं संबोधलं होतं. पण त्यानंतर त्यांच्या कणखर कार्यकर्तुत्वाला सलाम करत विरोधीपक्ष नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचा दुर्गा असा उल्लेख केल्याचंही सपकाळ यांनी सांगितलं. त्यामुळं सुनेत्रा पवार यांनी देखील गुंगी गुडिया या इमेजमधून बाहेर पडत दुर्गेसारखी प्रतिमा निर्माण करावी, असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com