BJP Politics : जयंत पाटलांना मोठा धक्का, भाजपकडून घरातील माणूस फोडण्याची तयारी, 'भाचेबुवा' हाती घेणार कमळ?

Jayant Patil Prajakta Tanpure : जयंत पाटील यांचे भाचे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना फोडण्याची तयारी भाजप करत असल्याची चर्चा आहे. तनपुरे यांचा बदललेला वेश हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे.
Jayant Patil Prajakta Tanpure
Jayant Patil Prajakta Tanpuresarkarnama
Published on
Updated on

Prajakta Tanpure News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना त्यांच्या कुटुंबातच धक्का देण्याची तयारी भाजपने केली आहे. जयंत पाटलांचे भाचे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना फोडण्याच्या हालचाली भाजपकडून केल्या जात असल्याच्या चर्चा आहे. राहुल विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी तनपुरेंना भाजपमध्ये घेण्यासाठी फासे टाकले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले प्राजक्त तनपुरे यांच्याकडून भाजप प्रवेशाबाबत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र, मला आमदार होण्याची कुठलीही घाई नाही, अक्षय कर्डिलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे वक्तव्य त्यांनी केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

तनपुरेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेंना उधाण आल्याने अक्षय कर्डिले हे अस्वस्थ झाल्याचे सांगितले जात आहेत. त्यांनी मुंबईत जात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेटीगाठी घेतल्याची देखील चर्चा आहे. दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांची बदललेली वेशभूषा हा देखील मतदारसंघात चर्चेचा विषय ठरली आहे.

Jayant Patil Prajakta Tanpure
Pune crime : विद्येच्या माहेरघरात रक्ताचा सडा! कॉलेजच्या उंबरठ्यावरच विद्यार्थिनीवर कोयत्याने सपासप वार; पुण्यात नक्की चाललंय काय?

गळ्यात भगवा पंचा, भगवी टोपी घालून माजी प्राजक्त तनपुरे हे मतदारसंघात दिसले. मढी येथे देखील त्यांनी भेट दिली. त्यामुळे त्यांची ही बदललेली वेशभूषा भाजपशी जवळीक साधण्यासाठी असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यातूनच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

तनपूरे यांचे एका दगडात दोन पक्षी...

प्राजक्त तनपुरे यांनी मला आमदार होण्याची घाई नाही, असे म्हणत राहुरी विधानसभेची निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, हे संकेत देत असताना 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभेसाठी आपला दावा मजबूत केल्याची चर्चा आहे. दरम्यान, भाजपकडून अक्षय कर्डिलेंना उमेदवारी मिळणार का? याची देखील उत्सुकता भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.

Jayant Patil Prajakta Tanpure
Land scam : धक्कादायक! अवैध ठरवलेल्या जमिनीसाठी 160 कोटी मंजूर; शिवसेना आमदाराने मंत्री बावनकुळेंसमोरच केला तहसीलदाराचा भांडाफोड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com