

Jyoti Waghmare: ठाण्यातील ठाकरे सेनेचे विभागप्रमुख दिपक पुर्णेकर यांची त्यांच्या विरोधकांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. यावरुन आता राजकारण पेटलं आहे. कालच संजय राऊतांनी या प्रकरणी अनेक पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडत गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. यानंतर आता शिंदे गटाच्या राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी महाविकास आघाडीवर आगपाखड केली आहे. तसंच यावेळी त्यांनी संजय राऊत यांना तुम्ही जामिनावर बाहेर आहात असं सांगत एका खटल्याची आठवण करुन दिली.
हत्या होणं हा अत्यंत दुर्देवी प्रकार आहे, त्यांच्या कुटुंबियांप्रती आम्हाला सहानुभूती आहे. महाराष्ट्राचं पोलीस दल इतकं सक्षम आहे की आरोपी कोणीही असलं तरी ते कोणालाही पाठिशी घालणार नाहीत. याप्रकरणाचा पूर्ण निष्पक्ष असा तपास होईल आणि यात आरोपींना शिक्षा होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. पण मला एकच प्रश्न पडतो की, अशा अनेक घटना घडतात परंतू जिथं राजकारण दिसतं तिथेच संजय राऊत आणि उबाठा का धाऊन जातात. म्हणजे हा मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे का?
ज्योती वाघमारे म्हणाल्या, "म्हणजे एखाद्याची चिता जळत असेल तर तुम्ही त्यावर राजकारणाचा भाकऱ्या शेकणार आहात का? कोण आहेत संजय राऊत? राऊत तुम्ही विसरलात का? तुम्ही स्वतः १०० दिवस पत्राचाळ घोटाळ्यात तुरुंगात होतात. राऊत तुम्ही सध्या जामिनावर बाहेर आहात, असं असताना सुद्धा केवळ केवळ राजकारण करणं, आरोप-प्रत्यारोप करणं आणि चिखलफेक करणं याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्राचं पोलीस दल त्या कुटुंबियांना न्याय देतील"
त्यांच्या कुटुंबियांनी कोणाचं नावही घेतलं असलं तरी पोलीस यामध्ये निष्पक्ष चौकशी करतील. आरोपी कोणीही असला तरी त्याला पाठिशी घातलं जाणार नाही, अशीच भूमिका वेळोवेळी शासनानं घेतलेली नाही. परंतू जेव्हा कुटुंबिय जेव्हा आपल्या घरचा माणूस गेला तेव्हा रडतात तेव्हा त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यापेक्षा आपल्या राजकीय फायद्यासाठी तिथं जातात. यांना कुठल्याही गोष्टीत राजकारण दिसतं, असंही त्यांनी म्हटलं.
दिशा सालियान हीच्या वडिलांचा आक्रोश यांच्या काळजापर्यंत का पोहोचत नाही? यापूर्वी शिवसैनिकांच्या हत्या झाल्या होत्या तिथं ते का जात नाहीत. त्यांच्या कुटुंबियांच्या भावना समजून घेण्यासारख्या आहेत. पण राऊत, आदित्य ठाकरे किंवा उबाठा असेल त्यांना फक्त यामध्ये आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या आहेत. त्यांनी आता मढ्याच्या टाळूवरच लोणी खाणं बंद करावं. बीडपेक्षा ठाण्याची अवस्था वाईट आहे असंही राऊत म्हणाले त्याला उत्तर देताना खासदार वाघमारे म्हणाल्या, एकनाथ शिंदेंनी आपल्या कर्तुत्वानं जिथं विकास केला त्या ठाण्याला बदनाम करणं हा अत्यंत बेशरम प्रकार आहे, अशा शब्दांत खासदारांनी संजय राऊतांवर आगपाखड केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.