
Mumbai News : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड खंडणीप्रकरणातून मारहाण झाल्याचे उघड झाले आहे. असाच प्रकार आता भाजप नेते आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्ता असणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने देखील केल्याचे उघड आले आहे. त्याने एकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने धस देखील राजकीय अडचणीत आले आहे. मारहाण प्रकरणामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता आहे. मारहाणीच्या प्रकरणात एकंदरीत महायुतीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कांदिवली विधानसभा प्रमुख लालसिंह राजपुरोहितला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे सध्या नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून राजकीय चर्चेला उचलण्यात आले आहे. तर या अटकेनंतर शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष आणि नेतृत्वाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राजपुरोहितला शिवसेनेतून निलंबन करण्यात आले आहे.
रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून खंडणी वसुलीच्या प्रकरणात कांदिवली पोलिसांनी लालसिंह राजपुरोहितला रविवारी (ता.9) अटक केली. त्याच्यावर आणखी एका फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी, राजपुरोहितला खंडणी वसुलीच्या धमकीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याचा अटकपूर्व जामिन देखील सत्र न्यायालयाने फेटाळला असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
राजपुरोहित आणि त्याच्या सहा कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांमध्ये 28 डिसेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर हा गुन्हा रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलीय. तर राजपुरोहित आणि त्याच्या सहा साथिदारांनी 27 डिसेंबर रोजी दुपारी ठेकेदार तक्रारदार आशिष मल्हा यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून दमदाटी केली होती. तसेच त्याच्याकडे 5 लाखांची खंडणी मागितली होती.
यानंतर आशिष मल्हा यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. आशिष मल्हा हे सांताक्रुझ (पश्चिम) येथील रहिवासी असून ते बीपीसीएल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांच्याच कंपनीला इराणी वाडी, आर वॉर्डमध्ये सिमेंट रस्ता बांधण्याचे काम मिळाले होते. हेच काम सुरू करण्याआधी राजपुरोहित आणि त्याच्या सहा कार्यकर्त्यांनी मल्हा यांनी दमदाटी करत मारहाण केली होती. तसेच 5 लाखांची खंडणी मागितली होती.
सध्या महायुतीतील दोन मित्र पक्षांना त्याच्या कार्यकर्ता आणि नेत्यांमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आहे. तर सुरेश धस सतीश भोसले उर्फ खोक्या भाईमुळे अडचणीत आले आहेत. अशातच शिवसेना कांदिवली विधानसभा प्रमुखालाच अटक झाल्याने विरोधकांना आयता मुद्दा मिळाला आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांनी राजपुरोहितला पक्षातून निलंबत केले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.