
Nagpur News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत अनेक अर्बन नक्षल समर्थक व त्यांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या. या नक्षल समर्थकांना संविधानावर विश्वास नाही. संविधानाने निर्माण केलेली व्यवस्था, संस्था यांच्यावरही त्यांचा विश्वास नाही. यातूनच ईव्हीएमला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात एक बैठक काठमांडूत झाली. यातील काही संघटना विधानसभेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी झाल्या होत्या, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. (Devendra Fadnavis news)
काही विदेशी शक्ती भारतात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी निवडणुकीत महाविकास आघाडीचा त्यांनी आधार घेतल्याचा आरोपही यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ग्रामीण भागातील विशेषत बंदुकधारी नक्षलवाद्यांचा बिमोड केंद्र सरकारने केला आहे. आता त्यांच्या संघटनेत कोणी जायला तयार नाही. त्यामुळे शहरी नक्षलवाद्याला खतपणी घातले जात आहे.
नक्षलवाद्यांना संविधान मान्य नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या संस्था व व्यवस्थेला त्यांचा विरोध आहे. त्यांना आपले स्वतंत्र व राज्य कायदे हवे आहेत. यापूर्वी नलक्षवादी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करीत होते. आता त्यांनी ईव्हीएमला विरोध करण्याचे ठरवले आहे.
नेपाळमधील काठमांडू शहरात एक बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीला भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले काही लोक आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रेत अशा एकूण 40 संघटनांचा सहभाग होता. आपला अजेंडा राबवण्यासाठी निवडणुकीत महाविकास आघाडीचा (MVA) खांदा त्यांनी वापरल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.
शहरी नलक्षवाद्यांचे उद्योग आजपासून सुरू नाही. मनमोहनसिंग पंतप्रधान आणि राज्यात आर.आर. पाटील गृहमंत्री असतानापासून ही चळवळ सुरू आहे. 2012 मध्ये आर. आर. पाटील यांनी अर्बन नलक्षवाद्यांच्या काही संघटना नागपूर आणि चंद्रपूरला कार्यरत असल्याचा अहवाल दिला होता. 2014 मध्ये मनमोहन सिंग यांनी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने ७ फ्रंटल ऑर्गनायजेशन महाराष्ट्रात कार्यरत असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यातील सात संघटना भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या, अशीही धक्कादायक माहिती फडणवीस यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.