कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेची निवडणूक (KDCC Bank Election) आता रंगतदार अवस्थेत आली आहे. २१ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्यानंतर आता १५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. दोन्ही पॅनेलची घोषणा झाल्यानंतर आता या निवडणुकीसीठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात होणार आहे. शनिवारपासून सत्ताधारी गट पायाला भिंगरी बांधून बाहेर पडणार आहे, तर विरोधकांचा प्रारंभ रविवारी होणार आहे.
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी उमेदवारी निश्चित झालेल्या उमेदवारांनी यापुर्वीच प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र पॅनेलच्या राजकारणाने वळण घेतल्यानंतर दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू आहे. सत्तारूढ गटाच्या प्रचाराचा शुभारंभाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Yadrawakar), आमदार विनय कोरे (Vinay Kore), प्रकाश आवाडे (Prakash Aawade), पी. एन. पाटील (P.N.Patil) अशी दिग्गज मंडळी उपस्थित रहाणार आहेत. गडहिंग्लजमधील सभागृहात सकाळी ११ वाजता या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.
तर सत्ताधाऱ्यांनी जागांचा प्रस्ताव नाकारलेल्या शिवसेनेने त्यांच्यापासून फारकत घेत अचानक नव्या पॅनेलचीच घोषणा केली. या पॅनेलमध्ये त्यांनी शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय गटाला जोडीला घेतले आहे. या पॅनेलचा प्रचार शुभारंभ रविवारी ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजता होणार आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik), माजी आमदार चंद्रदीप नरके (Chandradeep Narake), सत्यजित पाटील-सरूडकर अशी मंडळी उपस्थित राहणार आहेत.
अशातच माजी आमदार नरके यांच्या घरी २४ डिसेंबरला लग्नकार्य आहे, त्यासाठी येणारे शिवसेनेचे राज्य पातळीवरील नेतेही या प्रचार शुभारंभाला उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांची खलबत आणि प्रचाराची गोलमेज परिषद भरण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे सत्तेत एकत्र असलेल्या आणि कोल्हापूरमध्ये देखील रोज मांडीला मांडी लावून बसणाऱ्या सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि जिल्ह्यातील शिवसेनेच्याच नेतेमंडळींना एकमेकांचा विरोध करावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.