

Mira Bhayandar crime : मीरा-भाईंदरमध्ये 500 रुपयांच्या नोटा केमिकलच्या माध्यमातून तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणाचा काशिगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून, तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 38 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोल्डन रिट्रीट हॉटेल, काजूपाडा येथे काही व्यक्ती केमिकलच्या सहाय्याने 500 रुपयांच्या नोटांची संख्या वाढवता येते, असे सांगून नागरिकांना आमिष (Crime) दाखवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
या कारवाईत अमोल वसंत बंडगर (43), चैत्राली शंकर चक्रबोर्ती (27) आणि निशा सुनील मोरे (41) यांना ताब्यात घेण्यात आले. या तिघांकडे पोलिसांनी (Police) प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. यातून यामागे कोणते रॅकेट आहे, याचा शोध घेण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे.
पोलिसांनी आरोपींकडून 500 रुपयांच्या नोटा, केमिकलच्या बाटल्या, काळ्या रंगाने रंगवलेल्या नोटा, प्लास्टिक पॅकेट, नोटा वाळवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, सहा मोबाईल फोन आणि दोन बॅग असा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी काशिगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 318(4), 62 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काशिगाव पोलीस करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.