Vaibhav Naik ACB Notice : ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांना पुन्हा ACB ची नोटीस; बेहिशेबी मालमत्ता...

Vaibhav Naik ACB Notice : तब्बल सहा वेळा गैरहजर, कारवाईचा फास आवळणार..?
Vaibhav Naik ACB Notice
Vaibhav Naik ACB NoticeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kokan News : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यामागील अडचणी संपण्याचे चिन्हे दिसत नाहीत. शिवसेनेतल्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत राहिलेले आमदार वैभव नाईक यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांना अनेकदा अँन्टी करप्शन ब्युरो (ACB Action) म्हणजचे एसीबीची नोटीस आली आहे. तर अनेकदा ते भाजप (BJP) नेत्यांच्या आणि राणे कुटुंबियांच्या (Rane Family) निशाण्यावर असतात. आता मात्र पुन्हा एकदा त्यांना एसीबीची नोटीस आली आहे.

Vaibhav Naik ACB Notice
‘वैभव नाईक कितीही मोर्चे काढा; हे शिंदे-फडणवीस सरकार आहे, चुकीला माफी नाही’

आमदार वैभव नाईक यांना पुन्हा एकदा एसीबीने नोटीस पाठवली आहे. येत्या २८ जून ला रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयामध्ये त्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चौकशीसाठी हे आदेश आहेत. ५ डिसेंबर २०२२ ला वैभव नाईक एसीबीच्या चौकशीला सामोरे गेले होते. आता पुन्हा एकदा त्यांना जून महिन्यात हजर राहण्याची नोटीस आली आहे.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी नाईक यांना ही नोटीस पाठवण्यात आली असून, त्यांना चौकशीला उपस्थित राहा, असे आदेश देण्यात आलेले आहेत. या नोटीशीमध्ये सहा वेळेला चौकशीला बोलावलं पण एकदाही चौकशीसाठी हजर न राहिल्याची ताशेरे ओढलेले आहेत.

Vaibhav Naik ACB Notice
Vaibhav Naik Birthday : कोकणाच्या राजकारणातील 'जायंट किलर'; कोण आहेत वैभव नाईक?

आमदार वैभव नाईक यांची सध्या मालमत्ता प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी सुरु आहे. याप्रकऱणी ते यापूर्वी एकदा एसीबी कार्यालयात उपस्थित राहिले होते. यापूर्वी नाईक यांच्या मतदारसंघातील भरणीचे सरपंच आणि ठेकेदार यांची रत्नागिरीतील लाच लुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे चौकशी करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.