Shilpa Dhotre joins Shinde Sena; Bharat Gogawale And Sunil Tatkare
Shilpa Dhotre joins Shinde Sena; Bharat Gogawale And Sunil Tatkaresarkarnama

Sunil Tatkare : गोगावलेंनी नगरपंचायतीवर भगवा फडकवत राष्ट्रवादीला धक्का दिला, तेथेच तटकरेंनी शिवसेनेचा काटा काढला, इशाराही देत म्हणाले, 'गद्दारांना माफी...'

Sunil Tatkare Vs Bharat Gogawale : रायगड जिल्ह्यातील राजकारणात जोरदार घडामोडी घडत असून मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यात वाद टोकाला जाताना दिसत आहे.
Published on
Summary
  1. भरत गोगावले यांनी म्हसळा नगराध्यक्ष व नऊ नगरसेवकांना शिंदे शिवसेनेत घेतल्याने तटकरे कुटुंबावर मोठा राजकीय धक्का बसला.

  2. त्यावर सुनील तटकरे यांनी पलटवार करत शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल करून गोगावलेंना जोरदार धक्का दिला.

  3. तटकरे यांनी कठोर इशारा देत म्हटले—“यापुढे गद्दारांना माफी नाही”, त्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले.

Raigad News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकारणात जोरदार हालचाली होताना दिसत असून येथे महायुतीत नाराजी नाट्य दिसत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीत सध्या दुरावा निर्माण झाला आहे. फक्त दुरावाच नाही तर आता दोन्ही पक्षांकडून कुरघोडी केली जात आहे. नुकताच गोगावले यांनी म्हसळामध्ये खासदार सुनील तटकरे यांना धक्का दिला होता. येथे राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या नगरपंचायतीवर भगवा फडकवत नगराध्यक्षासह नगरसेवकांना आपल्याकडे खेचलं आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची आता परतफेड तटकरे यांनी केली असून शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

राज्यात 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या असून सध्या सर्वच जिल्ह्यांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशातच राजकीय पक्षांमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेत्यांना आपल्या आपल्या पक्षाच खेचलं जात आहे. रायगडमध्ये देखील विरोधकांचे पक्ष फोडून झाल्यानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकमेकांच्या पक्ष फोडणीकडे मोर्चा वळवला आहे.

तटकरे यांना मंत्री भरत गोगावले यांनी मोठा धक्‍का देत म्हसळा नगरपंचायतील मोठा धक्का दिला होता. येथे नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणला. यामुळे राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या म्‍हसळा नगरपंचायतीवर भगवा फडकला होता. यामुळे येथे तटकरे यांना मोठा धक्का बसल्याचे मानसले जात होते.

Shilpa Dhotre joins Shinde Sena; Bharat Gogawale And Sunil Tatkare
'...फुलं उचलून शपथ घ्या' Bharat Gogavle यांचं चॅलेंज, Sunil Tatkare यांच्या पोराने स्वीकारलं ।Raigad

दरम्यान आता तटकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देत म्हसळा तालुक्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनाच फोडले आहे. या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल करत गोगावलेंना जोरदार धक्का दिला आहे.

तसेच त्यांनी यावेळी इशारा दिला असून, 'यापुढे गद्दारांना माफी नाही'. कोणी कोणाला वाचवण्यासाठी येऊ शकत नाही आणि जी काही कार्यवाही करायची असेल ती होईल, असेही ते म्हणाले. या पक्षप्रवेशामुळे रायगडच्या राजकारणात, विशेषतः म्हसळ्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे सेनेवर राजकीय कुरघोडी केल्याचे आता चर्चा सुरू आहे.

यावेळी तटकरे यांनी, “कोण कोणाचा आसरा घेण्यासाठी गेलं असेल, किंवा आणखी कशासाठी गेलं असेल. पण यापुढे गद्दारांना माफी नाही. हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. जी काही कायदेशीर कारवाई करायची असेल ती होईलच.

पण कोणी कोणाला वाचवण्यासाठी येऊ शकत नाही. कारण त्यासाठी नितीमत्ता असावी लागते”. त्यामुळे आता या इशाऱ्यानंतर नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांवर पक्ष सोडल्याने पक्षातर्फे कायदेशीर कारवाई होते का? तटकरे ही कारवाई करतात का आता हे पाहावं लागणार आहे.

Shilpa Dhotre joins Shinde Sena; Bharat Gogawale And Sunil Tatkare
Sunil tatkare : तटकरेंविरोधात नाराजीचा स्फोट : आरोपांचा बॉम्ब टाकून खंद्या समर्थकाने सोडली साथ; ठाकरेंच्या सेनेला पाठिंबा

FAQs :

1. गोगावलेंनी कोणाला शिवसेनेत प्रवेश दिला?

म्हसळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि नऊ नगरसेवकांनी गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

2. तटकरे यांनी कशी प्रतिक्रिया दिली?

तटकरे यांनी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी फोडून त्यांना राष्ट्रवादीत घेत पलटवार केला.

3. सुनील तटकरे यांनी दिलेला इशारा काय?

“यापुढे गद्दारांना माफी नाही” असा कठोर इशारा त्यांनी दिला.

4. या घडामोडींचा राजकीय समीकरणावर कसा परिणाम झाला?

रायगडमधील NCP–Shiv Sena राजकीय संतुलन बिघडून मोठी खळबळ उडाली आहे.

5. आदिती तटकरे यांच्यावर याचा कसा प्रभाव पडला?

या घडामोडींनी त्यांना राजकीय नुकसान झाल्यासारखे वाटले पण तटकऱ्यांच्या पलटवारामुळे परिस्थिती काही अंशी संतुलित झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com