

रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे.
शिवसेना नेत्यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी थेट फटकारले आहे.
या घटनेमुळे रायगडमधील महायुती आणि विरोधकांमध्ये नव्या राजकीय वादाची ठिणगी पडली आहे.
Raigad News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच गरम होताना दिसत आहे. येथे आता दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटण्यास सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते आपल्या पक्षाची ताकद वाढवताना दिसत असून एक मेकांवर आरोप करताना दिसत आहेत. यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीत वाद आता शिगेला गेल्याचे चित्र आहे.
अशातच सुनील तटकरे यांनी आता सतत टीका करणाऱ्या शिवसेनेला खडे बोल सुनावत कडक शब्दात इशारा दिला आहे. त्यांनी कोण काय बोलतोय ते मी शांत पणाने ऐकतोय. पण मी जर एकदा बाहेर पडलो ना तर दुप्पट वेगाने कामाला लागत असतो असाच दम भरला आहे. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा वाद भडकण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि महेद्र थोरवे यांच्याकडून तटकरे यांना लक्ष केलं जात आहे. तर तटकरे यांच्याकडूनही त्याला मोजक्याच शब्दात प्रत्युत्तर दिलं जात आहे.
तर गोगावले यांनी युतीसाठी हात पुढे केले असतानाही आमदार थोरवे यांनी राष्ट्रवादीशी युती नाहीच असा पवित्रा घेतला आहे. यामुळे महायुतीतील या दोन्ही पक्षात सुरू असणारा वाद थांबणार कधी असा सवाल रायगडमध्ये विचारला जात होता.
यादरम्यान आता तटकरे यांनी टिकेचे लक्ष्य करणार्या शिवसेनेला चांगलेच सुनावले आहे. त्यांनी कोण काय बोलतो हे मी शांत पणाने ऐकत आहे. सध्या मी शांत पणाने हे सगळं ऐकतोय. त्याला आपण काहीच प्रतिक्रिया देत नाही. पण याचा अर्थ आम्ही काही हतबल किंवा कमकुवत नाही, हे लक्षात ठेवा.
पण जेंव्हा वेळ येईल तेंव्हा राजकीय प्रतिकार करायला मी दुप्पट वेगाने बाहेर पडेन असा इशाराही त्यांनी शिवसेनेला दिला आहे. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतेली वाद आणखी वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
1. सुनील तटकरे यांनी कोणाला फटकारले?
शिवसेना नेत्यांनी केलेल्या टीकेवर तटकरे यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना फटकारले.
2. हा वाद कशामुळे सुरू झाला?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
3. सुनील तटकरे कोणत्या पक्षाचे आहेत?
ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार आहेत.
4. रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण कसे आहे?
सध्या वातावरण अतिशय तापलेले असून दोन्ही गटांमध्ये तीव्र टीका सुरू आहे.
5. या घटनेचा निवडणुकीवर काय परिणाम होईल?
स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.