
रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी युतीचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले.
मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी असा कोणताही प्रस्ताव आपल्याला आलेला नसल्याचे सांगत गोगावले यांना खडेबोल सुनावले.
या वक्तव्यांमुळे रायगडच्या राजकारणात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्यातील संबंधांबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
Raigad News : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे आरक्षण जाहीर झाले असून जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना अॅक्शन मोडवर आली असून थेट भिडणाऱ्या राष्ट्रवादीशी सेटलमेंटसाठी हात पुढे केला आहे. तर रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीशी युती नाहीच असे ठासून सांगणाऱ्या शिवसेनेला आणि ज्यांनी ऑफर दिली त्यांनाच विचारा असे खडे बोल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी ही प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले यांनी दिलेल्या ऑफरवर दिली आहे. यामुळे जिल्ह्यात आता शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणं शक्य नसल्याचीच चर्चा सुरू झाली आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असणाऱ्या वादानंतर आगामी स्थानिकच्या तोंडावर शिवसेना नेते गोगावले यांच्यासह त्यांचे आमदार महेंद्र दळवी यांनी बैठक घेतली. त्यांनी जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांच्या निवडणूका महायुती म्हणूनच लढवायच्या अशी सामंजस्याची भूमिका घेतली. तसेच जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरवत तो राष्ट्रवादी समोर ठेवला. यावरून तो राष्ट्रवादी मान्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 15 पंचायच समित्यांचे सदस्यांचे आरक्षण नुकताच जाहीर झाले. यानंतर महायुतीतील पक्ष एकत्र लढणार का याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. दरम्यान शिवसेना नेते गोगावले यांनी शिवसेने तर्फे राष्ट्रवादी समोर युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती दिली. त्यांनी आमदार असलेल्या मतदारसंघातील 7 जागा त्या पक्षानं लढवाव्यात तर उर्वरित तीन जागा या सामोपचाराने वाटून घ्यायच्या असा प्रस्ताव ठेवला आहे. रायगड जिल्ह्यात शिंदे सेनेचे 3, भाजपचे 3 आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. त्यामुळे शिंदेसेना 21, भाजप 21 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला 10 जागा येणार आहे. त्यामुळे या प्रस्तावरून आता चर्चा सुरू झाली होती.
अशातच खासदार तटकरे यांनी यावर थेट प्रतिक्रिया देत असा रायगड जिल्ह्यात असा युतीबाबत शिवसेनेकडून कोणताच प्रस्ताव आपल्यापर्यंत आलेला नाही. त्यामुळे याबाबत मला आता माहिती माध्यमांकडूनच मिळत आहे. तर याबाबत ज्यांनी माहिती दिली त्यांनाच आता हा प्रश्न विचारा म्हणजे उत्तरही मिळेल असे म्हणत हा विषय संपवला आहे.
तर गोरेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमाला आपण फक्त आपल्या संस्कृती प्रमाणे जात असल्याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. दरम्यान शिवसेनेकडून अशा पद्धतीने युतीचा प्रस्ताव आला म्हणजे तुम्ही सांगता म्हणून तो कसा आला याबाबत मी अनभिज्ञ आहे. कारण याच लोकांनी पातळी सोडून टीका केली होती. राष्ट्रवादीशी युती नाहीच असा पवित्रा घेतला होता. ज्यात काही संवैधानिक पदावर बसलेली लोकही आहेत. ज्यांचा माझ्यापेक्षा राजकीय अभ्यास दांडगा आहे. आता त्यांनी या युतीच्या प्रस्तावावर प्रकाश टाकावा असाही टोला तटकरे यांनी लगावला आहे.
तटकरे यांनी आगामी स्थानिकबाबत राज्यस्तरावर पक्षाने तयारी केली असून रणनीती आखल्याचेही सांगितले आहे. तसेच जिल्हा स्तरावर याबाबत पार्लमेंट्रीबोर्ड तयार करण्यात येणार आहे. या बोर्डाचे प्रमुख पालकमंत्री सहपालकमंत्री प्रमुख असतील. तर जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार आणि महिला युवकांचेही प्रतिनीधी यात असणार आहेत. याचे आदेश येत्या तीन ते चार दिवसात होतील. या बोर्डाने जिल्ह्याच्या तापळीवर राजकीय स्थितीचा आढावा बैठका घेवून करावा आणि तो अहवाल दिवळीनंतर मुंबईत बैठकीत आम्हाला द्यायचा आहे. याच अहवालावरून आगामी बाबत रणनीती आखली जाईल.
दरम्यान शिवसेना जिल्हाध्यक्षांना स्थानिकबाबत एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. यावरून तटकरे यांनी स्वबळाचा नारा देणाऱ्यांना एक प्रकारे सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यांनी अशा पद्धतीने आदेश दिल्याचे माझ्या ऐकण्यात नाही. पण जिल्हा पातळीवर पालकमंत्री संपर्कमंत्री असून ते याची माहिती घेतली. ते समन्वय समितीसमोर याबाबी ठेवतील. ज्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यामुळे अशा पद्धतीने वेगळी भूमिका घेण्यापेक्षा जी रचना आहे ती फोलो करावी.
1. भरत गोगावले यांनी काय प्रस्ताव दिला होता?
रायगड स्थानिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी पक्षाशी युती करण्याची ऑफर भरत गोगावले यांनी दिल्याचे सांगितले गेले.
2. सुनील तटकरे यांनी या प्रस्तावावर काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी असा कोणताही प्रस्ताव आपल्याला आलेला नसल्याचे स्पष्ट केले आणि गोगावले यांना खडेबोल सुनावले.
3. हा वाद कोणत्या पार्श्वभूमीवर निर्माण झाला?
रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद उभा राहिला आहे.
4. गोगावले कोणत्या पक्षाचे नेते आहेत?
भरत गोगावले हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आहेत.
5. या वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या घडामोडींमुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.