Lok Sabha Election : अजित पवारांच्या लोकसभेचे चार उमेदवार धोक्यात असताना रायगडमधून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण एकतर्फी निवडणूक जिंकण्याचा दावा करणाऱ्या अनंत गितेंचा तब्बल 80 हजारांच्या फरकाने पराभव करत आहेत. 27 फेऱ्यानंतर तटकरे 80 हजार मतांनी आघाडीवर होते. अजूनह दोन फेऱ्या बाकी होत्या.मात्र या फेऱ्यांमुळे फरक पडणार नाही. त्यामुळे फक्त तटकरेंच्या अधिकृत विजयाची घोषणाच बाकी आहे.
एक्झिट पोलमध्ये तर सुनील तटकरे Sunil Tatkare पराभूत होत असल्याचे अंदाज होते. मात्र, प्रत्यक्ष मत मोजणीच्या दिवशी सुनील तटकरे यांनी आघाडी घेतली. मतमोजणी केंद्रावर सकाळीच अनंत गिते आणि सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र, तटकरेंचे लीड वाढत असताना अनंत गिते मतमोजणी केंद्रावर ठाण मांडूण होते.
15 वी फेरी अखेर तटकरेंचे लीड 44 हजार 429 वर पोहचले होते. त्यामुळे अजित पवार गट एक जागा जिंकणार ही आशा पल्लवीत झाली होती. 17 वी फेरी अखेर तटकरेंचे लीड 57 हजारांवर पोहचले होते.
25 व्या फेरी अखेर तटकरेना 73 हजार 518 लीड मिळाले आणि तटकरेंच्या समर्थकांनी निवडणूक Election मतमोजणी केंद्रा बाहेरच विजयी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली.
27 वी अखेर सुनील तटकरे यांना 80 हजार 758 मतांची आघाडी होती त्यावेळी महाड मतदासंघातील दोन फेऱ्या शिल्लक होत्या. मात्र तटकरे यांच्या विजयाची केवळ औपचारिकता राहिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.