Bogus Voter : अंबरनाथमध्ये मतदाना दिवशीच राजकीय भडका! बोगस मतदार, EVM मध्ये छेडछाड अन् पोलिसांचा लाठीचार्ज

Municipal Council Election Voting : राज्यातील 23 नगरपरिषदा व नगर पंचायतींमधील आज निवडणूक होत आहे.
Bogus Voter
Bogus Voter sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. राज्यातील रखडलेल्या 23 नगरपरिषद व नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे.

  2. अंबरनाथमध्ये बोगस मतदान व EVM छेडछाडीचे आरोप झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

  3. भाजप-काँग्रेस आरोप-प्रत्यारोप आणि पोलिसांच्या सौम्य लाठीचार्जमुळे वाद अधिक चिघळला आहे.

Ambarnath News : राज्यातील रखडलेल्या 23 नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा आज धुरळा बसणार असून आज (ता.20) मतदान होत आहे. तब्बल 23 नगरपरिषदांच्या अध्यक्षांसह १४३ सदस्यांसाठीचे मतदान होत आहे. अशातच अंबरनाथमध्ये बोगस मतदान आणि EVM मधील छेडछाडीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार आरोप-प्रत्यारोपाची फैरी झाडल्या जात असतानाच पोलिसांकडून देखील सौम्य लाठीचार्ज करण्यात आल्याने आता वादाला उकळी फुटली आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार (20 डिसेंबर) मतदान होत असून प्रशासनाने काटेकोर तयारी केली आहे. यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशीच (शुक्रवारी) शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी EVM मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच येथे बोगस मतदानाचा मोठा संशय देखील व्यक्त करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अंबरनाथच्या कोसगाव परिसरात एका सभागृहात मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष जमले होते. हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणलं असल्याचा आरोप काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जावून गोंधळ घातला. या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराने आणल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय.

Bogus Voter
Bogus Voters Thane : 'बोगस मतदार यांद्यामध्ये घुसवले तर याद राखा, थेट अधिकाऱ्यांच्या घरासमोरच राडा'; ठाकरेंच्या शिलेदारानं निवडणूक आयोगालाच ठणकावलं

या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या सभागृहातून २०८ जणांना ताब्यात घेतलं आहे. हे नागरिक मतदानासाठी भिवंडीवरून आल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला असून आता ची चौकशी आता केली जाते आहे. तर चौकशीनंतर मतदान प्रक्रियेशी संबंध सिद्ध झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मात्र या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण तापलं आहे.

EVMमध्ये छेडछाड?

दरम्यान मतदानाच्या आदल्या दिवशीच येथे EVM मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. या प्रकरणात उमेदवार शैलेश भोईर यांनी भाजप उमेदवाराचा भाऊ तुषार तेलंगे यांच्यावर थेट आरोप केला आहे. त्यांनी भाजप उमेदवाराच्या भावानेच EVM छेडछाडी केल्याचे म्हटले आहे. जे अंबरनाथमधील साऊथ इंडियन शाळेत उभारलेल्या मतदान केंद्रावर असल्याचे म्हटलं आहे.

यानंतर येथे शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मतदान केंद्राबाहेर जमा झाले होते. यावेळी पदाधिकाऱ्यांची शासकीय कर्मचाऱ्यांसोबत जोरदार बाचाबाची झाली. शिवसेना नेते गोपाळ लांडगे यांनी EVM मशीन तातडीने बदलण्याची आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली. सध्या येथे आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले असून शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या अंबरनाथमध्ये भाजपने उमेदवार देत कांटेंकी टक्कर निर्माण केली आहे. यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

पोलिसांचा लाठीचार्ज

अंबरनाथ नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक सुरू झाली असून मोतोश्री नगर मतदान केंद्राबाहेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. मतदानावेळी भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा संशय शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आला. यावरूनच येथे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने गोंधळ झाला. ज्यानंतर तणाव निर्णाम झाला. ज्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पागंवले.

Bogus Voter
Ratnagiri Assembly bogus voters : ठाकरेंच्या शिलेदारांनं फोडला 'पेन ड्राईव्ह बॉम्ब'; बोगस मतदारांची माहिती विधानसभेलाच होती, पण...

FAQs :

1. आज किती नगरपरिषदांसाठी मतदान होत आहे?
➡️ राज्यातील 23 नगरपरिषद व नगरपालिकांसाठी मतदान होत आहे.

2. एकूण किती पदांसाठी मतदान आहे?
➡️ 23 नगरपरिषद अध्यक्षांसह 143 सदस्यांसाठी मतदान होत आहे.

3. अंबरनाथमध्ये वाद का झाला?
➡️ बोगस मतदान व EVM छेडछाडीचे आरोप झाल्यामुळे.

4. कोणत्या पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत?
➡️ भाजप आणि काँग्रेसकडून परस्परांवर आरोप केले जात आहेत.

5. पोलिसांनी काय कारवाई केली?
➡️ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com