Maharashtra Politics : कोकणात ठाकरेंना मोठा धक्का, ऑपरेशन टायगर सुरु असतानाच पक्षातील बडा नेता करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Raigad Shivsena UBT Crises : राज्यात एकीकडे ऑपरेशन टायगर झाले असतानाच कोकणात आता याचा दुसरा अंक पाहायला मिळत असून ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Raigad Shivsena Politics : राज्यात पमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर सुरु केलं असून 2022 नंतर चार वर्षांनी ठाकरेंचे सहा खासदार फोडले. यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला असून आता आमदार आणि मुंबई महपालिकेत देखील धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत शिंदेंचे नेते बोलत असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्ष अतुल चोगले यांच्यासह त्यांचा गट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. यामुळे रायगडच्या राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता असून घडामोडीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

राज्यात एकीकडे एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर यशस्वी झालं असून आता दुसरीकडे ठाकरेंना धक्के बसण्यास सुरूवात झाली आहे. रायगड जिल्ह्यात याची सुरूवात झाली असून श्रीवर्धन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अतुल चोगले यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. तर त्यांच्यासह त्यांचा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी पक्षप्रवेश करणार आहेत.

सध्या या पक्षप्रवेशाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून चोगले हे ठाकरे गटाचे जिल्ह्यातील एकमेव महत्त्वाचे नेते असून नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा पक्षांतराचा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या पक्षांतराचा राजकीय परिणाम स्थानिक पातळीवर सत्तेचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Shivsena UBT News
Shivsena UBT Crises : ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट! 'बंडखोर सहा नव्हे तर सात खासदार', रामदास कदमांचा खळबळजनक दावा

अतुल चोगले यांनी मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय जितेंद्र सातनाक यांचा पराभव केला होता. तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रभावक्षेत्रातील नगरपालिकेचे नगराध्यक्षपद गेल्याने या विजयाची राज्यभर चर्चा झाली होती. हा विजय राजकीयदृष्ट्या शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जात होता.

तसेच चोगले यांची ही राजकीय वाटचाल आधीच चर्चेत राहिली होती. पण आता राज्यात ऑपरेश टायगरची जोरदार चर्चा असतानाच त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवेशामुळे एकीकडे ठाकरेंची ताकद कोकणात कमी होताना दिसत असून शिंदेंची वाढत आहे. तर या प्रवेशामुळे मंत्री अदिती तटकरे यांना होमटाऊनवरच शिवसेनेकडून अडचण निर्माण केली जाणार आहे.

Shivsena UBT News
Shivsena : पुण्यात शिवसैनिकांमध्ये राडा; आदित्य ठाकरेंनी पाठ फिरताच पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की?

दरम्यान काहीच दिवसांच्या आधी मंत्री भरत गोगावले यांनी अतुल चोगले यांची भेट नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर घेतली होती. या भेटीनंतरच त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. तर या प्रवेशातून राष्ट्रवादीला शह देण्याची रणनीती आखण्याचे काम गोगावले करत असल्याचेही बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com