

Ratnagiri Panchayat Samiti elections News : राज्यात नुकताच झालेल्या महानगरपालिकेंच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले आहे. यानंतर आता आगामी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी महायुतीने घडामोडींना वेग दिला आहे. याचपार्श्वभूमिवर तळकोकणासह कोकणात महायुतीने जागा वाटपांचा फॉर्म्युला स्पष्ट केला आहे.
पण यानंतर रविवारी (ता.18) सिंधुदुर्ग मधील ओरोस येथे भाजपध्ये नाराजी उफाळून आली आहे. येथे 43 पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामे दिले आहे. यामुळे खळबळ उडाली असतानाच आता शेजारच्या जिल्ह्यात देखील भाजपमध्ये जागावाटपावरून नाराजी नाट्य सुरू झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप वाट्याला फक्त दोनच जागा सोडल्याने नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीचे जागावाटप निश्चित झाले असून रत्नागिरी तालुक्यात २० पैकी अवघ्या दोन जागा भाजपला देण्यात येणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेकडून १६ गणातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर वाटद आणि हरचिरी हे दोनच गण भाजपसाठी सोडले आहेत. यामुळे भाजपमधील अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी पंचायत समितीचे शिवसेनचे उमेदवार जाहीर केले. पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (ता.१७) जिल्हा परिषदेच्या जागांवरील काही उमेदवार जाहीर केले होते. गेल्या काही दिवसात भाजपला रत्नागिरी, राजापूर व लांजा या तीन तालुक्यातील जिल्हा परिषदेची एकही जागा दिली जाणार नाही, अशी चर्चा रंगली होती. त्याला अनुसरून घटना घडत आहेत. शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. उर्वरित उमेदवारांची नावेही उद्या जाहीर होतील, असे सांगण्यात येत आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात १२ जिल्हा परिषद गट आहेत. त्यातील दोन संगमेश्वर तालुक्यात आहेत. रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी, देऊड, करबुडे, नेवरे, कोतवडे, झाडगाव, खेडशी, केळये, हातखंबा, नाणीज, नाचणे, कर्ला, फणसोप, पावस, गावखडी या गणातील तर कसबा, परचुरी, माभळे येथील उमेदवार जाहीर झाले आहेत.
मागील पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या झंजावतामध्ये भाजपला अवघी एकच जागा मिळवता आली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु अवघ्या दोनच जागा देण्यात आल्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
पंचायत समितीसाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये दोन जागा भाजपला सोडण्यात आल्या होत्या. प्रचाराचे नियोजन केले आहे.
- प्रदीप उर्फ बंड्या साळवी, तालुकाप्रमुख
1) रत्नागिरी पंचायत समिती निवडणुकीत भाजपला किती जागा मिळाल्या?
भाजपला रत्नागिरी तालुक्यातील 20 पैकी केवळ 2 जागा मिळाल्या आहेत.
2) भाजपला कोणते गण सोडण्यात आले आहेत?
वाटद आणि हरचिरी हे दोन गण भाजपसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
3) शिवसेनेने किती उमेदवार जाहीर केले आहेत?
शिवसेना (शिंदे गट) कडून 16 गणांतील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
4) भाजपमध्ये नाराजी का निर्माण झाली आहे?
अत्यल्प जागा मिळाल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
5) या जागावाटपाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
भाजपमधील असंतोषामुळे युतीच्या निवडणूक रणनितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.