Maharashtra Politics : फडणवीसांच्या वक्तव्याला छेद! भाजप-एमआयएम युतीने शिवसेना संतापली! शिंदेंच्या शिलेदाराचा थेट हल्लाबोल अन् अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Kokan BJP-Shivsena Politics : राज्यात एकीकडे एमआयएमशी केलेल्या युतीमुळे भाजप अडचणी आली असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने भाजपबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Devendra Fadnavis|Eknath Shinde
Devendra Fadnavis|Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. महापालिका निवडणुकीनंतर भाजपने अचलपूर नगरपालिकेत एमआयएमसोबत युती करून सत्ता स्थापन केली आहे.

  2. या युतीमुळे भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेत तणाव वाढला असून भरत गोगावले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

  3. एमआयएमच्या अभूतपूर्व यशामुळे महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणात मोठे बदल होताना दिसत आहेत.

Raigad Politics : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये 'एमआयएम'ला अभूतपूर्व यश मिळाले आहे. अकोट नगरपालिकेत भाजपने या पक्षासोबत सत्तेचा सारीपाट मांडल्यानंतर मोठी टीकेची झोड उठली होती. ज्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमशी युती कदापी होणार नाही म्हणत स्पष्टीकरण दिले होते. पण आता महापालिकांच्या निवडणुकीचे निकालानंतर पुन्हा एकदा भाजपकडून सत्तेसाठी एमआयएमशी अचलपूर नगरपालिकेत युती झाली आहे. ज्यावरून भाजप-शिंदेंच्या शिवसेनेत तणाव वाढल्या दिसत आहे. कोकणात देखील या युतीमुळे राजकारण चांगलेच तापले असून शिंदेंच्या मंत्र्‍यांनी भाजपवर दाखवलेल्या अविश्वासाची जोरदार चर्चा रंगली आहे. तर भाजपने केलेल्या पलटवारामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत ‘एमआयएमच्या’ अभूतपूर्व यशानंतर राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेमध्ये भाजपने अकोटमध्ये नाकारलेल्या ‘एमआयएम’शी युती केली आहे. या युतीने राज्याच्या राजकारणात भूकंप आणला असून भाजपकडून ‘एमआयएम’ नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद सोडण्यात आले आहे.

तर सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी भाजपची असल्याची टीका विरोधकांनी भाजपवर केली आहे. एकीकडे मुंब्य्रात एमआयएमच्या नगर सेविका सहर शेखच्या वक्तव्यावर टीका करणाऱ्या भाजपने दुसरीकडे सत्तेसाठी एमआयएमशी युती केल्याने भाजपचा खरा चेहरा समोर आल्याचे बोलले जात आहे.

Devendra Fadnavis|Eknath Shinde
Devendra Fadnavis Vs Eknath Shinde : शिंदे श्रीनगरला गेले अन् आलेही, फडणवीसांची ‘ती’ कृती नाराजी समजायची का?

याचवरून आता रायगडमधील राजकारण चांगलेच तापले असून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांनी 'भाजपवाले कधी कुणाशी युती करतील हे सांगता येत नाही', असे धक्कादायक विधान केले आहे. ज्याचे पडसाद आता उमटत असून शिवसेनेला भाजपवर विश्वास नसल्याचे उघड झाले आहे. तर शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आल्याची चर्चा रंगली आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीतील युतीवरून गोगावले यांनी भाजपला डिवचले असून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सध्या त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तसेच भाजपवर शिवसेनेला भरवसा नाय काय? असा प्रश्न आता रायगडची जनता विचारत आहे.

रायगडमधील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती करा असे वरिष्ठांचे आदेश आहेत. पण इथले भाजपचे नेत्यांना आमच्या गोष्टी पसंत नसाव्यात. त्यामुळे ते वरिष्ठांचे आदेश मानताना दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकला चलो रेचा नारा देखील दिला आहे.

तर हा निर्णय घेण्यामागे भाजप कारण असल्याचेही गोगावले यांनी सांगितले. एकीकडे रायगडमधील भाजपचे नेते आमच्याशी चर्चा करतात. त्यानंतर ते दोन दिवसात दुसऱ्यांशी चर्चा करतात आणि त्यांच्या युती होतात . त्यामुळे दक्षिण रायगडमध्ये आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचं गोगावले यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान आता या टीकेला नगरसेवक तथा भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटावर केला आहे. त्यांनी, गोगावले साहेबांना जर खरच भाजपवर भरवसा नसेल तर त्यांनी त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांची भेट घ्यावी आणि त्यांनाच विचारावे की त्यांचा भाजवर भरवसा आहे की नाही. विधानसभेला आम्ही महायुती म्हणून पूर्ण सहकार्य शिवसेनेसह आपल्याही मतदार संघात काम केलं होतं. तर शिवसेनेनं देखील भाजपसाठी काम केलं होतं. तर एकमेकास सहकार्य करू अवघे धरू सुपंथ या म्हणी प्रमाणे महायुतीत काम झालं आहे. त्यामुळे याच भान गोगावलेंसह सर्वांनीच ठेवायला हवं असेही आवाहन त्यांनी केलं आहे.

Devendra Fadnavis|Eknath Shinde
Devendra Fadnavis Davos : देवेंद्र फडणवीसांनी दावोसमधून मुंबईसाठी काय काय आणलं; 15 लाख नोकऱ्या अन्...

FAQs :

1) भाजपने एमआयएमसोबत युती कुठे केली?
👉 अचलपूर नगरपालिकेत भाजपने एमआयएमसोबत युती केली आहे.

2) देवेंद्र फडणवीस यांनी याआधी काय भूमिका घेतली होती?
👉 भाजप एमआयएमसोबत युती करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

3) भरत गोगावले यांनी भाजपवर काय आरोप केले?
👉 भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतो, असा अविश्वास त्यांनी व्यक्त केला.

4) या युतीचा शिवसेनेवर काय परिणाम झाला?
👉 भाजप-शिवसेना संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

5) एमआयएमच्या यशाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
👉 आगामी स्थानिक व विधानसभा राजकारणावर या यशाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com