राणेंना नोटीस येताच फडणवीसांनी वकिली बाणा दाखवत पोलिसांनाच आणलं अडचणीत

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पोलिसांनी बजावलेल्या नोटिशीवरून शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा थेट संघर्ष आता सुरू झाला आहे.
Devendra Fadnavis and Narayan Rane

Devendra Fadnavis and Narayan Rane

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. राणेंनी या नोटिशीला कोणतेही उत्तर दिले नसले तरी यावरून वाद पेटला आहे. शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा थेट संघर्ष आता सुरू झाला आहे. भाजप नेतृत्वाने राणेंना आलेल्या नोटिशीची दखल घेतली असून, खुद्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मैदानात उतरले आहेत. त्यांनी वकिली बाणा दाखवत राणेंना नोटीस काढणाऱ्या पोलिसांना अडचणीत आणले आहे.

विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले की, सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते. सीआरपीसी 160 ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस ठाण्यात साक्षीसाठी बोलावता येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलीस अधिकाऱ्यांवर आयपीसी 166A अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी आहे. असे न केल्यास भाजप सीआरपीसी 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा आयपीसी 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल.

नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना नितेश यांच्या ठावठिकाण्याबद्दल वक्तव्य केले होते. नितेश हे गायब असून, ते कुठे आहेत या प्रश्नावर राणे यांनी वक्तव्य केले होते. नितेश राणे कुठे आहेत, हे मला माहिती असले तरी मी सांगणार नाही. मला माहिती असले तरी मी ते तुम्हाला का सांगू, असे विधान नारायण राणेंनी केले होते. राणेंना त्यांचे पुत्र कुठे आहेत, हे माहिती असूनही ते सांगत नाहीत, असा अर्थ पोलिसांनी काढला आहे. त्यामुळे त्यांना काल दुपारी 3 वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पोलिसांनी बजावली होती. राणेंनी कामात व्यग्र असल्याचे कारण पुढे करीत हजर राहणे टाळले होते.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis and Narayan Rane</p></div>
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी आज सुरू आहे. राणेंना न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नसल्याने त्यांना कधीही अटक होऊ शकते. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तीन दिवसांपासून सुनावणी सुरू आहे.

<div class="paragraphs"><p>Devendra Fadnavis and Narayan Rane</p></div>
तोपर्यंत आमचा संबंध नाही! निवडणूक आयोगाने झटकले हात

न्यायालय राणेंच्या जामिनावर आज कोणता निर्णय घेते, यावर ते अटक होणार की नाही हे स्पष्ट होईल. मात्र, पोलीस दलाने आधीपासूनच पूर्ण तयारी केली आहे. कणकवली पोलीस ठाण्यात हालचालींना वेग आला आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. राणेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यास पोलीस तातडीने अटक करण्याच्या हालचाली करतील, असे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com