वैभववाडी : राज्यात सध्या तब्बल सात हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं धुमशान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चांगलीच फिल्डिंग लावली आहे.
वैभववाडी तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीचे भाजपला मानणारे सरपंच आणि ७१ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आणले आहेत. त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीवर भाजपचा वरचष्मा दिसत आहे.
जिल्हा परिषद (ZP) , विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाजवळ (Lok Sabha elections) आल्याने सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. सध्या अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे घुमशान सुरू आहे.
जिल्हा परिषद निवडणुका ( ZP elections) काही महिन्यांवर तर विधानसभा आणि लोकसभा निवडणूक दीड वर्षात होणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीत आपला गट मजबूत करण्याची कोणतीही संधी सोडली जात नाही. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील वैभववाडी (Vaibhavwadi) तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकाही अशाच गाजत आहेत.
दरम्यान, १७ ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापैकी भाजपला मानणाऱ्या ५ ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे उमेदवार बिनविरोध झाले तर ७१ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले आहेत. या सर्वांचा सत्कार वैभववाडीच्या भाजप (BJP) कार्यालयात करण्यात आला.
तर १८ डिसेंबरला ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी (Gram Panchayat Elections) मतदान होणार आहे. तसेच २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच राज्यातील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.