

भाजप नेते वैभव खेडेकर यांनी त्यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांना खेड नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरून निवडणूक मैदानात उतरवले आहे.
यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री योगेश कदम यांच्याशी थेट सामना निर्माण झाला आहे.
खेडच्या राजकारणात भाजप विरुद्ध शिवसेनेची तुफान चुरस निर्माण झाल्याने निवडणूक चांगलीच रंगणार आहे.
Khed Nagarparishad Election : मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड नगरपरिषद निवडणुकीत युतीतीतच दोस्तीत कुस्ती लागण्याची शक्यता आहे. येथे नुकताच भाजप आणि शिवसेनेचे नेते आमने-सामने आले होते. तर भाजपच्या आमदारासह जिल्हाध्यक्षाने थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा पाकलमंत्री उदय सामंत यांच्यासह गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर नाराजी व्यक्त राजीनामे दिले होते. तसेच आपण भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या मागे असल्याचेच यातून दाखवून दिले होते.
आता भाजपने वैभव खेडेकर यांना पुढे करत मोठा डाव टाकला असून योगेश कदम यांना खिंडीत गाठण्याची रणनीती आखली आहे. खेडेकर यांनी त्यांची पत्नी वैभवी खेडेकर यांना अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. यामुळे येथे आता महायुतीमध्येच राजकीय आखाडा रंगण्याची शक्यता असून अर्जांची छाननी त्या माघार घेणार की थेट लढतीच्या मैदानात उतरणार हे खळणार आहे.
राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. सोमवारी (ता.17) उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून आजपासून अर्जांची छाननी होणार आहे. 26 नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्ह देण्यासह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. तर 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे.
खेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. येथे शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याची घोषणा करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्यात आली होती. त्यामुळे महायुती तुटल्याचे स्पष्ट झाले होते. तर खेडमध्ये महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या माधवी बुटाला यांनी अर्ज भरला होता. यावेळी मंत्री योगेश कदमही उपस्थितीत होते. पण भाजप नेते वैभव खेडेकर अनुपस्थित राहिल्याने जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. ज्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी भाजपच्या तीन उमेदवारांचे अर्ज भरण्यास उपस्थिती लावली होती. तसेच येथे सोडण्यात आलेल्या तीन जागांवरून भाजपमध्ये नाराजी उसळली होती.
दरम्यान भाजपकडून नगरसेवकांच्या 15 जागांसाठी अर्ज भरण्यात आले असले तरीही युती म्हणून शिंदेच्या शिवसेनेनं केवळ 3 जागा सोडल्या आहेत. ज्यानंतर येथे राजकीय नाट्य रंगले होते. पण अखेरच्या दिवशी वैभव खेडेकर यांनी त्यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले. वैभवी खेडेकर यांनी अपक्ष म्हणून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरल्याने खेडसह रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार खळबळ उडाली आहे.
यावेळी खेडेकर यांनी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे भाजपकडून 3 जागांवर अर्ज भरण्यात आले आहे. पण अद्याप युतीची चर्चा सुरू असल्याने जास्त जागा सुटू शकतात. आमचीही मागणी तीच आहे, ती पूर्ण होईल, या आशेने आम्ही 15 जागांसाठी अर्ज भरल्याची सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
तसेच त्यांनी जिल्ह्यात इथेन पुढे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडककेला दिसेल, असा शब्द रवींद्र चव्हाण यांना दिल्याचे म्हटले आहे. तर कोकणात अनेक वर्षांपासून विशिष्ट पक्षाची सत्ता असून दुसरा पक्ष पुढे जाऊ नये, यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही केला आहे. तर आपला भाजपमध्ये पक्षप्रवेश होऊ नयेत यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. पण झाले काय? तोच देव आणि नेते माझ्यासोबत असल्याचा दावा देखील वैभव खेडेकर यांनी केला आहे.
FAQs :
खेड नगराध्यक्षपदासाठी.
भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या समर्थनाने.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री योगेश कदम.
भाजप आणि शिवसेना यांच्यात थेट राजकीय टक्कर निर्माण झाली आहे.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनाच्या कालावधीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.