Vaibhav Khedekar : भाजप-शिवसेनेची युतीही धोक्यात! सामंतांसह कदमांचा डाव माजी आमदाराने उधळला! वैभव खेडेकरांचा मार्गही मोकळा

BJP Vs Shivsena In Khed Nagarparishad Election : रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींच्या निवडणुका लागल्या असून खेड नगरपरिषदेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली. पण आता या युतीवरून वाद समोर आला आहे.
Khed Nagarparishad Election; BJP Vaibhav Khedekars, Shivsena Uday Samant Yogesh Kadam
Khed Nagarparishad Election; BJP Vaibhav Khedekars, Shivsena Uday Samant Yogesh Kadamsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. खेड नगरपरिषदेसाठी भाजप-शिवसेना युती जाहीर झाली असली तरी भाजप पदाधिकाऱ्यांनी या युतीला विरोध दर्शवला आहे.

  2. भाजप नेत्यांनी योगेश कदम यांच्या जागा वाटप फॉर्म्युल्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पत्राद्वारे वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.

  3. जागा वाटपात सुधारणा न झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिल्याने उदय सामंत यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.

Khed News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. खेडसह राज्यातील नगरपरिषदांसाठी प्रत्यक्ष नामांकन भरण्याला सुरूवात झाली असून आजचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी खेड नगरपरिषदेसाठी भाजप आणि शिवसेनेनं युतीची घोषणा झाली.

तसेच सौ. माधवी राजेश बुटाला (शिवसेना) यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. पण आता याला भाजपचे माजी आमदार, जिल्ह्याध्यक्ष, उपाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. या युतीला आपला विरोध असून शिवसेना मंत्री योगेश कदम यांच्या जागा वाटपाचा प्रस्ताव मान्य नसल्याचे म्हटले आहे. तर जागा वाटपाचा फॉर्म्युल्यात सुधारणा झाली नाही तर आपण राजीनामा देवू असा इशाराच भाजपच्या वरिष्ठांना दिला आहे. यामुळे महायुतीतील नेत्यांसह पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. तसेच नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैभव खेडेकर यांना दिलासा मिळाल्याचे आता बोलले जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. खेडमध्ये महायुतीतच वाद उफाळल्याचे दिसत असून शिवसेना आणि भाजपने नगरपरिषदेसाठी युती करत राष्ट्रवादीशी फारकत घेतलीय. यामुळे येथे राष्ट्रवादीने आधीच संताप व्यक्त केला आहे. तर आता भाजप-शिवसेना युतीला भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध करत नकार दिला आहे.

Khed Nagarparishad Election; BJP Vaibhav Khedekars, Shivsena Uday Samant Yogesh Kadam
Vaibhav Khedekar : भाजपमध्ये प्रवेश करताच वैभव खेडेकरांचा नवा राजकीय डाव? थेट नगराध्यक्षपदावर दावा; शिंदेच्या शिवसनेत खळबळ

खेड नगरपरिषद स्वबळावर जिंकण्याची शक्यता असताना शिवसेना आमदार योगेश कदम यांनी केवळ तीनच जागा सोडल्या आहेत. जे भाजपवर अन्याय करणारा निर्णय असल्याचे म्हणत माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यासह जिल्ह्याध्यक्ष केदार साठे यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आणि नितेश राणे यांना पत्र लिहले आहे. तसेच या पत्रामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही म्हटलं आहे.

दरम्यान आता भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी भाजपवासी झालेल्या वैभव खेडेकर यांच्या पत्त्यावर पडल्याची चर्चा सुरू आहे. नुकताच खेडेकर यांनी बायकोच्या (वैभवी) नगराध्यक्षपदासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी नगराध्यक्षपदावर दावाच करत पत्नी वैभवी खेडेकर यांचे नगराध्यक्ष अशा आशयाचे व्हॉट्सअॅप स्टेटसही ठेवले होते. तसेच ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. यामुळेच येथे महायुतीतील बेबनाव अल्याचे समोर आले होते.

नुकताच येथे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत युतीची घोषणा झाली आणि नगराध्यक्षपदही शिवसेनेच्या वाट्याला गेले होते. महायुतीकडून माधवी बुटाला याचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनासह दाखल करण्यात आला होता. हा अर्ज दाखल करताना खेडेकरही अनुपस्थितिही होते. यामुळे भाजपकडूनच खेडेकर यांचा गेम केल्याची, रणनीतीला ब्रेक लावल्याची चर्चा सुरू झाली होती. यामुळेच ते नाराज झाल्याचेही येथे बोलले जात होते.

पण आता येथील भाजपच्या माजी आमदारासह जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी थेट कदम यांच्यावर टीकेची झोड उडवली आहे. कदम सतत खेडेकरांसह भाजपच्या नेत्यांवर टीका करत असतात. हे त्यांनी बंद करावे, जागा वाटपाचा फार्म्युला सुधारावा असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे खेडेकरांच्या मनासारखं येथे झाल्याची आता चर्चा सुरू झाली आहे. पण आता येथे झालेली ही युती टिकणार काय? भाजप खेडेकर यांच्या पत्नीचा अर्ज दाखल करण्यास सांगणार काय? की राष्ट्रवादीसह आठवलेंच्या आरपीआय गटाला जवळ करून दुसरा निर्णय घेणार, हे पाहावं लागणार आहे.

Khed Nagarparishad Election; BJP Vaibhav Khedekars, Shivsena Uday Samant Yogesh Kadam
Vaibhav Khedekar : मनसेतून हकालपट्टी केलेल्या वैभव खेडेकरांना मानाचे पान; भाजपकडून दिवाळीचे डबल रिटर्न गिफ्ट, पत्नीलाही मोठी संधी?

FAQs :

1. खेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत वाद कशावरून पेटला आहे?
→ भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपावरून वाद निर्माण झाला आहे.

2. कोणत्या नेत्यांनी युतीला विरोध केला आहे?
→ माजी आमदार, जिल्हाध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी युतीला विरोध केला आहे.

3. योगेश कदम यांच्यावर कोणते आरोप करण्यात आले आहेत?
→ जागा वाटपाचा प्रस्ताव पक्षपाती असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

4. या प्रकरणात वैभव खेडेकर यांचा काय उल्लेख आहे?
→ भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या वैभव खेडेकर यांना या घडामोडींमुळे दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.

5. भाजप नेत्यांनी पुढील काय पाऊल उचलण्याची शक्यता आहे?
→ जागा वाटप सुधारले नाही तर राजीनामा देण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com