नितेश राणेंचा पाय खोलात! न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Nitesh Rane 

Nitesh Rane 

Sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. राणेंना न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नसल्याने त्यांना कधीही अटक होऊ शकते.

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. राणे आणि सरकारी पक्षाच्या वतीने यावर आज युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सलग तीन दिवस सुनावणी सुरू होती. राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात अखेर फैसला झाला आहे. यामुळे नितेश राणेंना अटक होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane&nbsp;</p></div>
मतदानादिवशीच जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत अडचणीत

न्यायालय राणेंच्या जामिनावर कोणता निर्णय यावर ते अटक होणार की नाही हे स्पष्ट होईल. मात्र, पोलीस दलाने आधीपासूनच पूर्ण तयारी केली आहे. कणकवली पोलीस ठाण्यात हालचालींना वेग आला आहे. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. राणेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यास पोलीस तातडीने अटक करण्याच्या हालचाली करतील, असे चित्र आहे.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane&nbsp;</p></div>
काँग्रेसची ताकद वाढणार! अपक्ष आमदार लवकरच पक्षाच्या तंबूत

प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा मोबाईल दोन दिवसांपासून नॉट रिचेबल येत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेने ते गायब झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु असून पोलिसांची पथके गोव्यातही त्यांच्या शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com