Sindhudurg News: मुंबईतील दहिसर परिसरात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. आधी उल्हासनगर आणि गुरुवारी दहिसरमध्ये गोळीबाराची घटना घडली. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. (BJP MLA Nitesh Rane On Abhishek Ghosalkar Case)
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी भाजप (BJP) आमदार नितेश राणेंनी गंभीर आरोप करत अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही ठाकरे गटात अंतर्गत सुरू असलेल्या गँगवॉरचा परिणाम असल्याचं विधान करत नितेश राणेंनी ठाकरे गटावर निशाणा साधला. त्यांच्या या गंभीर आरोपामुळे खळबळ उडाली आहे. तसेच अभिषेक घोसाळकर यांना मारणाऱ्या मॉरिसचे सीडीआर तपासावे, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"आदित्य विरुद्ध राऊत हा जो गँगवॉर ठाकरे गटाअंतर्गत सुरू आहे, तो आधी फक्त कपडे फाडेपर्यंत होत होता, पण आता गोळी झाडेपर्यंत आला आहे. अभिषेक घोसाळकर हे आदित्य ठाकरे गँगमधले आहेत, तर मॉरिस आणि संजय राऊत यांचे काय संबंध आहेत ? यासाठी त्यांचे सीडीआर तपासले पाहिजेत, अशी मागणी मी करेन व ज्या पद्धतीने राऊत तेजसला प्रमोट करत आहेत, त्यामुळे हे गँगवॉर अजून कठोर आणि टोकाचे होत चालले आहेत," असा खळबळजनक आरोप राणे यांनी केला.
मॉरिस आणि उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचे काय संबंध आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. त्याचे सीडीआर तपासले पाहिजेत, अशी मागणी राणे यांनी केली. तसेच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची नार्को टेस्ट केली पाहिजे, असंही राणेंनी म्हटलं.
जो मॉरिस राहुल गांधी यांच्या मुंबईतील यात्रेच्या तयारीला लागलेला, जो मॉरिस सगळीकडे उद्धव ठाकरे यांचे बॅनर लावायचा तोच मॉरिस आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयावर गोळ्या झाडतो, असंही आमदार राणे म्हणाले.
आमच्या गृहमंत्र्यांच्या नावावर खडी फोडण्याअगोदर आणि सरकारवर टीका करण्याअगोदर तुमच्या ठाकरे गटांतर्गत सुरू असलेले गँगवार थांबवा, नाहीतर हा उद्या 'मातोश्री'पर्यंत पोहोचेल, अशी भीतीही आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली.
(Edited By-Ganesh Thombare)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.