नितेश राणेंच्या प्रकरणात जे अपेक्षित होते तेच झाले; आम्ही वारंवार सांगत होतो...

नितेश राणेंना अटक होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
 Prasad Lad

 Prasad Lad

sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. राणेंना न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नसल्याने त्यांना कधीही अटक होऊ शकते. राणेंना न्यायालयाने दणका देताच शिवसैनिकांनी कणकवलीत मोठा जल्लोष केला. त्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

<div class="paragraphs"><p>&nbsp;Prasad Lad</p></div>
राणेंचा जामीन अर्ज फेटाळताच पहिले फटाके आमदार नाईकांच्या समोरच फुटले!

लाड यांनी या संदर्भात आपल्या ट्वीटवरुन व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये लाड म्हणाले, नितेश राणे यांच्या प्रकरणात जे अपेक्षित होते तेच झाले. आम्ही वारंवार सांगत होतो. महाविकास आघाडीकडून राणे कुटुंबियांना अडकविण्याचा प्रयत्न होत आहे. जिल्हा संत्र न्यायालयात सरकारने किती ताकद लावली, किती यंत्रणा लावली याचा हा नमुना आहे. राणे कुटुंबियांना सरकार त्रास देत आहे. न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असून आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत. तिथे नक्कीच नितेश राणे यांना न्याय मिळेल असा विश्वास लाड यांनी व्यक्त केला.

दरम्यान, नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. राणे आणि सरकारी पक्षाच्या वतीने यावर आज युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सलग तीन दिवस सुनावणी सुरू होती. राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात अखेर फैसला झाला आहे. यामुळे नितेश राणेंना अटक होणार हे आता स्पष्ट झाले आहे. नितेश राणे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यक यांच्यातील कॉल रेकॉर्ड पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. सचिन सातपुते आणि राणे यांच्यातील कनेक्शन सिद्ध करणारे पुरावे पोलिसांकडे असल्याचेही समोर आले आहे. राणेंकडे सात मोबाईल असून, त्यातील डेटा मिळवण्यासाठी ते जप्त करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती.

<div class="paragraphs"><p>&nbsp;Prasad Lad</p></div>
उद्धवजींच्या शस्त्रक्रियेनंतर फडणवीसांचा रश्मीवहिनींना फोन; म्हणाले, ठाकरे कुटुंबीयांचे आमच्यावर उपकार!

यावर राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. नितेश राणे पोलिसांसमोर हजर राहणार का यावर राणेंचे वकील देसाई म्हणाले की, आम्ही अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार आहोत. अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात प्रलंबित असेल तर कायद्याने पोलिसांसमोर हजर न राहण्याचे अधिकार राणेंना आहेत. हे हजर होण्याची कोणतीही गरज नाही. आम्हाला शरण येण्याचा पर्याय योग्य वाटल्यास आम्ही तो स्वीकारू. मात्र, उच्च न्यायालयात गेल्यास राणे पोलिसांसमोर हजर राहणार नाहीत. राणेंनी आधीही पोलिसांनी सहकार्य केले असून, पोलीस ठाण्यात जाऊन त्यांचा जबाबही नोंदवला आहे. आमची तपासात सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com