राणेंचा जामीन अर्ज फेटाळताच पहिले फटाके आमदार नाईकांच्या समोरच फुटले!

संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Nitesh Rane and Vaibhav Naik

Nitesh Rane and Vaibhav Naik

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. राणेंना न्यायालयाने कोणताही दिलासा दिलेला नसल्याने त्यांना कधीही अटक होऊ शकते. राणेंना न्यायालयाने दणका देताच शिवसैनिकांनी कणकवलीत मोठा जल्लोष केला.

नितेश राणेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळताच कणकवलीतील शिवसेना शाखेसमोर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी घोषणाबाजी करीत फटाके वाजवण्यास सुरवात केली. या वेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibahv Naik) हे उपस्थित होते. नाईक म्हणाले की, कालपासून नारायण राणे आणि नितेश राणे हे पोलिसांवरच आरोप करीत होते. आता न्यायालयानेच राणेंवरील आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांनी आपल्या मुलाला कायद्यासमोर हजर करावे.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane and Vaibhav Naik</p></div>
सत्र न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर नितेश राणेंसमोर आता एकच पर्याय

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. राणे आणि सरकारी पक्षाच्या वतीने यावर आज युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सलग तीन दिवस सुनावणी सुरू होती. राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात अखेर फैसला झाला आहे. यामुळे नितेश राणेंना अटक होणार हे आता स्पष्ट झाले आहे. नितेश राणे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यक यांच्यातील कॉल रेकॉर्ड पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. सचिन सातपुते आणि राणे यांच्यातील कनेक्शन सिद्ध करणारे पुरावे पोलिसांकडे असल्याचेही समोर आले आहे. राणेंकडे सात मोबाईल असून, त्यातील डेटा मिळवण्यासाठी ते जप्त करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली होती.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane and Vaibhav Naik</p></div>
नितेश राणेंचा पाय खोलात! न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

यावर राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. नितेश राणे पोलिसांसमोर हजर राहणार का यावर राणेंचे वकील देसाई म्हणाले की, आम्ही अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करणार आहोत. अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात प्रलंबित असेल तर कायद्याने पोलिसांसमोर हजर न राहण्याचे अधिकार राणेंना आहेत. हे हजर होण्याची कोणतीही गरज नाही. आम्हाला शरण येण्याचा पर्याय योग्य वाटल्यास आम्ही तो स्वीकारू. पण उच्च न्यायालयात गेल्यास राणे पोलिसांसमोर हजर राहणार नाहीत. राणेंनी आधीही पोलिसांनी सहकार्य केले असून, पोलीस ठाण्यात जाऊन त्यांचा जबाबही नोंदवला आहे. आमची तपासात सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा मोबाईल दोन दिवसांपासून नॉट रिचेबल येत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेने ते गायब झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु असून पोलिसांची पथके गोव्यातही त्यांच्या शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com