Amit Thackeray : भाजपनंतर शिंदेंची शिवसेनाही अमित ठाकरेंविरोधात, 'मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!', कदमांच्या सुपुत्राचा हल्लाबोल

Siddhesh Kadam Attacks Amit Thackeray Over PM Modi Photo Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यावरून भाजप आक्रमक झाली असून मनसेविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. आता या वादात शिंदेंच्या शिवसेनेनं उडी घेतली आहे.
PM Modi Photo Controversy; MNS Amit Thackeray
PM Modi Photo Controversy; MNS Amit Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : पुण्यात दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवणे मनसे नेते अमित ठाकरेंना महागात पडले असून त्यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघा पदाधिकाऱ्यांना अटकदेखील झाली आहे. भाजपनेदेखील यावर आक्रमक पवित्रा घेत मनसेविरोधात आंदोलन केले. अशातच या भाजप विरुद्ध मनसे राजकीय वादात शिंदेंच्या शिवसेनेनं उडी घेतली असून अमित ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे सुपुत्र सिद्धेश कदम यांनी अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर अमित ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या फोटोवरून घेतलेल्या भूमिकेविरोधात आक्रमक टीका केली आहे. त्यांनी अमित ठाकरे यांचे हे वर्तन म्हणजे बालिशपणाचे असल्याचे म्हणत, जर 'मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!' अशी जहरी टीका केली आहे.

ते मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात प्लास्टिक रिसायकलिंग कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी बोलत होते. सिद्धेश कदम यांच्या या जहाल टीकेनंतर वाद वाढण्याची शक्यता असून भाजप विरुद्ध मनसे असा राजकीय वाद आता अधिकच पेटण्याची चिन्हे आहेत.

PM Modi Photo Controversy; MNS Amit Thackeray
Amit Thackeray Nashik : कायद्याच्या बालेकिल्ल्यात कॉलेजबाहेर टवाळखोरांचा त्रास; विद्यार्थिनींची अमित ठाकरेंकडे तक्रार, पोलिसांचा लगेचच दणका

सिद्धेश कदम यांनी अमित ठाकरे यांचे हे वर्तन बालिशपणाचे असून त्यांना कुठे आक्रमकता दाखवायची हे देखील कळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, हे देखील ते विसरले. जगाच्या नकाशावर मोदी साहेबांचे वर्चस्व आहे. पण हे जर तुम्हाला मान्य नसेल, तर तुम्ही भारतात कशाला राहता? असा प्रश्न केला आहे. तर तुम्ही पाकिस्तानमध्ये जा, असे म्हटले आहे.

PM Modi Photo Controversy; MNS Amit Thackeray
Amit Thackeray News : डांबर, पेव्हर ब्लॉक अन् काँक्रीटचा पॅच..,हा कोणत्या प्रकारचा रस्ता? अमित ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

एकीकडे राज्यात भाजप विरुद्ध मनसे असा राजकीय वाद पाहायला मिळत असतानाच आता सिद्धेश कदम यांनी जहाल वक्तव्य करत या वादाला नव्याने फोडणी दिली आहे. यामुळे आता भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेविरोधात मनसे असा राजकीय संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिद्धेश कदम यांच्या या जहाल वक्तव्यावर मनसे काय प्रतिक्रिया देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com