konkan News : बावनकुळेंनी वाढविले आमदार, खासदार इच्छुकांचे टेन्शन; 'निवडणूक प्रमुख हेच भविष्यातील उमेदवार...'

माजी खासदार नीलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

BJP News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जबाबदारी दिलेले निवडणूक प्रमुख हेच उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे येथे केली. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख प्रमोद जठार हे संभाव्य उमेदवार असतील, हे आता स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीचे उमेदवारही भाजपने जवळपास निश्चित केले आहे. (Chandrashekhar Bawankule increased the tension of MLAs, MP aspirants)

महाराष्ट्रात भाजपला (BJP) शिवसेना (Shivsena) युतीचा घटक पक्ष म्हणून हवा आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची मतेही हवी आहेत; परंतु २०२४ च्या निवडणुकीत भाजपला स्वपक्षाचे चारशेहून अधिक खासदार (MP) निवडून आणायचे आहेत. त्यासाठी देशातील मोठ्या राज्यांमध्ये जिथे जिथे शक्य आहे तेथून पक्षाचे उमेदवार देण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. अर्थातच, भाजपच्या या कृतीमुळे मित्रपक्ष दुखणारा असला तरी देशपातळीवर आणि राज्यपातळीवर जागावाटपात भाजप समन्वय साधेल, असे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.

Chandrashekhar Bawankule
Bawankule Request to Fadnavis : देवेंद्रजी सौजन्य सोडा ; ठाकरेंच्या टीकेनंतर बावनकुळेंचे फडणवीसांना आवाहन

भाजप शिस्तीचा पक्ष म्हणून ओळखला जातो. उमेदवारीबाबत भाजपमध्ये बंद दाराआड चर्चा होते. पक्षाने अपेक्षित उमेदवार दिला नाही तर कार्यकर्ते जाहीर नाराजी व्यक्त करत नाही. शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करणारे माजी खासदार नीलेश राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती.

Chandrashekhar Bawankule
BJP Vs NCP : भाजपचा डाव यशस्वी; राष्ट्रवादीला फायदा होऊ नये म्हणून शिरूर खरेदी-विक्री संघाची निवडणूक तीन महिने लांबणीवर

मागील दोन वर्ष राणे यांच्यापेक्षा प्रमोद जठार यांचे दौरे मतदार संघात वाढले आहेत. खरंतर हा मतदार संघ मिळवण्यासाठी भाजपला तगड्या उमेदवाराची गरज आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा भाजपसमोर पर्याय आहे; परंतु त्यांची खासदारकी अजून दोन वर्षे शिल्लक आहे. नीलेश राणे विधानसभेत जाण्यासाठी कणकवली मतदार संघातून इच्छुक आहेत, ही बाब जठार यांच्या पथ्थ्यावर पडणार आहे.

रत्नागिरी आणि गुहागर या दोन्ही पारंपरिक मतदार संघात भाजपने जुन्या लोकांवर जबाबदारी दिली आहे. चिपळूण, राजापूर आणि दापोली मतदारसंघातही भाजपने निवडणूक प्रमुखांची निवड करून इच्छुकांना कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत.

Chandrashekhar Bawankule
Supriya Sule On BJP Leader : निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत; सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका

ही चाल भाजप चालू शकतो

आगामी निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळवणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा सपाटून पराजय हे दोन उद्दिष्ट भाजपसमोर असणार आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बरोबर न घेता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांसमोर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार देण्याची चाल भाजप करू शकते.

Chandrashekhar Bawankule
Subhash Deshmukh challenge to Patole : सुभाष देशमुखांचं नाना पटोलेंना आव्हान; ‘माझी इमारत बेकायदेशीर असेल तर तत्काळ पाडा’

भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल

विरोधकांनी कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने प्रगती केली आहे. देशाची आर्थिक व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे माजी आमदार विनय नातू यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com