Gogawale Legal Trouble: गोगावलेंच्या अडचणी वाढणार? 'राणेंनी मर्डर वैगेरे...', विधानावरून गुन्हा दाखल होण्याची शक्यता?; शिवसेनाही आक्रमक

Bharat Gogawale Controversial Remarks On Narayan Rane : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या राणेंवरील असंवेदनशील विधानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Bharat Gogawale Reaction on Rane Brothers Demand
Bharat Gogawale Reaction on Rane Brothers DemandSarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg Political News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर असंवेदनशील विधान केले होते.

या वक्तव्यामुळे सिंधुदुर्गात राजकीय खळबळ उडाली असून वातावरणही तापलेलं आहे. तर येथे शिवसेना विरूद्ध भाजप असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता असून महायुतीत देखील अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता आहे. अशातच या वादात काँग्रेससह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील उडी घेतली आहे.

राणे यांच्याबद्दल असंवेदनशील, गंभीर आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वक्तव्याबद्दल गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तर गोगावलेंनी केलेल्या वक्तव्यात खरेपणा असल्याचा टोला शिवसेना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला आहे.

गोगावले नुकताच सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नारायण राणे यांच्यावर वक्तव्य केलं होतं. त्यांनी राणे यांच्याबद्दल गंभीर दावे केले होते. ज्यात राणेंनी मर्डर वगैरे... असा उल्लेख केला होता. यावरूनच जिल्ह्यात राजकारण पेटलं असून यात काँग्रेसने देखील उडी घेतली आहे. तर हे वक्तव्य असंवेदनशील, गंभीर आणि कायद्याचे उल्लंघन करणारे असून ते आजच्या पिढीला घातक आहे.

तसेच तर राणेंनी केलेले गुन्ह्यांची जर गोगावलेंना माहिती असेल तर ती त्यांनी का लपवली? ती पोलिसांना का दिली नाही, असा सवाल केला आहे . तसेच गोगावलेंचे सध्याचे वक्तव्य हे कार्यकर्ते, मुलांना गुन्हेगारीकडे प्रवृत्त करणारे असल्याचा दावा देखील जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केला आहे.

तसेच याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन गोगावलेंवर दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. यामुळे आता गोगावलेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरये, मेघना धुरी, अनिल डेगवेकर, सचिव बाळू मेस्त्री, व्ही. के. सावंत, प्रवीण वरुणकर, आयेशा सय्यद, दादा नेवाळकर, प्रभाकर इस्वलकर, प्रदीपकुमार जाधव, अजय मोरये, राजू वर्णे, बाबा काझी, रुपेश खेडकर, संदीप कदम आदी उपस्थित होते.

Bharat Gogawale Reaction on Rane Brothers Demand
Bharat Gogawale : 'नारायण राणे यांनी मर्डर अन् बारा भानगडी...'; निलेश राणेंसमोरच गोगावलेंचे धक्कादायक विधान

इर्शाद शेख म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा शांत जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण कॅबिनेट मंत्री असलेले भरत गोगावलेंना राणेंप्रमाणे जर उंची गाठायची असेल, मोठे व्हायचे असेल तर मारामाऱ्या करा, गुन्हे करा हेच कार्यकर्त्यांना सुचवायचे होते का? हे वक्तव्य समाजात चुकीचा संदेश देणारे असून गुन्हे करण्यासाठी चिथावणी देणारे आहे. मंत्री म्हणून त्यांचे हे वक्तव्य निंदनीय त्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे.

गोगावले आतापर्यंत आमदार झाले, मंत्री झाले ते या पद्धतीनेच झाले का? त्यांनी तरुणांना नोकरी, व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्याची गरज असतानाही ते गुन्हेगारीसाठी त्यांना प्रवृत्त करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

तसेच गोगावले यांनी जाहीर कार्यक्रमात राणेंच्या बाबतीत अशा पद्धतीने आरोप केले असतील तर राणेंच्या गुन्ह्यांबद्दल त्यांच्याकडे माहिती असावी. त्यामुळे या वक्तव्याच्या आधारे गोगावलेंना अटक करून त्यांची चौकशी करावी. पण या प्रकरणी गोगावलेंवर गुन्हा दाखल न झाल्यास काँग्रेस यावरून आक्रमक भूमिका घेईल, असाही इशारा इर्शाद शेख यांनी दिला आहे.

यादरम्यान याच प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी देखील जोरदार टोलेबाजी केली आहे. त्यांनी गोगावले यांनी ओघाने जरी ते वक्तव्य केंल असले तरी ते खरे आहे.

जिल्ह्यात यापूर्वी घडलेल्या दहशतवादाच्या घटना कुणी केल्या हे जनतेला ज्ञात आहे. त्यामुळे नीतेश राणे हे गोगावलेंना माफी मागायला लावणार का? हाच सगळ्यात मोठा प्रश्न असल्याचा टोला उपरकर यांनी लगावलाय.

Bharat Gogawale Reaction on Rane Brothers Demand
Bharat Gogawale : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या वक्तव्यावर गोगावलेंचा संताप; म्हणाले, 'कोण? काहीही...'

उपरकर म्हणाले, जिल्ह्यात दहशतवाद हा शब्द कुठून आला, हे सर्वांनाच माहित आहे. दीपक केसरकर यांनी त्यावेळी नारायण राणेंवर आरोप करत तेव्हाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. उदय सामंत शिवसेनेत होते तेव्हा तेही नारायण राणेंवर आरोप करत होते.

नारायण राणे जेलमध्ये कधीच गेले नसून त्यांनी कार्यकर्त्यांना जेलमध्ये जायला लावले. राणेंसोबत आम्ही तेव्हा शिवसेनेत काम करताना अनेक केसेस अंगावर घेतल्या पण, आम्ही कधी राजकीय दहशतवाद केला नाही. नारायण राणेंच्या राजकारणाला सुरुवात झाली तेव्हा त्यांची दोन्ही मुले राजकीय प्रवाहात नव्हती. राणेंनी दोघांनाही आधी कार्यकर्ते आणि नंतर नागरिकांवर लादल्याचा दावा उपरकरांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com