
Sindhudurg News : आगामी स्थानिकच्या आधी मोर्चे बांधणीला वेग आला असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना जोरदार तयारी करताना दिसत आहे. शनिवारी (ता.28) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळावा झाला. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेंबाबत एक धक्का दायक विधान केलं आहे. ज्यामुळे आता राज्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यावेळी राणे यांचे मोठे सुपूत्र निलेश राणेही व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळावा झाला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणेंसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गोगावले यांनी नारायण राणेंचं नाव घेत टोलेबाजी केली. पण या टोलेबाजीत त्यानी काही गंभीर गोष्टींचा उल्लेख केल्याने आता वाद सुरू होण्याची शक्यता आहे. तर याच मेळाव्यात सामंत यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना थेट इशाराही दिला आहे. ज्यामुळे मेळ्याव्याची आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
गोगावले यांनी, शिवसेनेला निलेश राणे जिल्ह्यात ताकद देत आहेत. पण काही लोक दीपक भाई केसरकर भानगडी करणारे असल्याची टीका करत आहेत. हे सत्य नाही. केसरकर भानगडी करणारे नाहीत. मात्र शिवसैनिक भानगडी केल्या नाहीत तर तो शिवसैनिक होऊच शकत नाही. पण आता ते दिवस गेले. ता एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे.
पूर्वी बाळासाहेब ठाकरे नारायण राणे साहेब यांना आम्ही जवळून पाहिली आहेत. जी आता या उंचीवर गेली आहेत. पण तो प्रवास सहज नव्हता. इथं पर्यंत पोहचण्यासाठी नारायण राणे यांनी, अंगावर केसस घेतल्या, मर्डर, बारा भानगडी केल्या. प्रसंगी ते जेलमध्ये गेले. याता अर्थ तुम्ही भानगडी करा असा होत नाही, असं होत असही गोगावले यांनी पदाधिकाऱ्यांना बजावताना जुळवून घ्यायला शिका. जसे आम्ही जुळवून घेतलं असं म्हटलं आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, मला नाही दिलं, त्याच दिलं असं करू नका, ज्याला पक्षानं तिकीटं दिलं त्याच्या मागे उभे रहा त्याला निवडून आणा. पण जर कोणी पक्षाच्या उमेदवाराला पाडायला प्रयत्न केलाच तर समजा त्याचा जय महाराष्ट्र झालाच समजाच, असा सूचक इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांसह महायुतीमधील मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांनाही दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.