Raigad Politics: रायगडमध्ये काँग्रेसची वाताहत सुरुच, माजी आमदाराची कन्या लवकरच हाती शिवबंधन बांधणार

Congress leader Snehal Jagtap : महाड विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या पुढील उमेदवार म्हणून स्नेहल जगताप यांच्याकडे पाहिले जात होते.
Raigad Politics
Raigad PoliticsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Raigad News: आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच प्रमुख राजकीय पक्षात इन्कमिंग आणि आऊटगोईंग जोरदारपणे सुरु आहे. यातच शिंदे फडणवीसांची नजर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर नजर असतानाच आता महाविकास आघाडीतही अंतर्गत इन्कमिंगही जोर धरु लागली आहे. महाडच्या माजी नगराध्यक्षा काँग्रेसचं युवा व तडफदार नेतृत्व म्हणून पाहिल्या जाणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानला जात आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

काँग्रेस(Congress) चे दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांच्याकडे महाड मतदारसंघातील काँग्रेसचा चेहरा म्हणून पाहिले जात होते. आता त्यांचा शिवसेना ठाकरे गटातील प्रवेश निश्चित झाल्याने महाड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Raigad Politics
Ram Satpute News: राम सातपुतेंवर भाजपश्रेष्ठींनी सोपवली मोठी जबाबदारी; गोवा, गुजरातनंतर आता कर्नाटक मोहीम

महाड विधानसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली तरी महाडची जागा ही उद्धव ठाकरे गटाला जाऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन जगताप यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

काही दिवसांपूर्वीच माथेरान काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आता महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यादेखील पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. येत्या ६ मे रोजी त्या शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

Raigad Politics
Atique Ahmed Murder Case : अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडण्यासाठी पिस्तूल देणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

बालेकिल्ल्यातच शेकाप आणि काँग्रेसला घरघर..

रायगड जिल्ह्यात एकेकाळी शेकाप आणि काँग्रेस हे प्रमुख राजकीय पक्ष म्हणून ओळखले जात होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याच दोन पक्षांत थेट लढत व्हायची. मात्र गेल्या काही वर्षांत दोन्ही पक्षांचा जनाधार घटल्याचे दिसून येत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेस आणि शेकापचा एकही उमेदवार जिल्ह्यातून निवडून येऊ शकलेला नाही. जिल्ह्यातील काँग्रेसची परिस्थिती तर मात्र खूपच बिकट झाली आहे.

Raigad Politics
Health Department News : आरोग्य विभागात `मुन्नाभाई`, वैद्यकीय शिक्षण नसतांना आरोग्य अधिकारी म्हणून करत होता काम..

युवा नेतृत्व म्हणून जगतापांची ओळख

स्नेहल जगताप या काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर पक्षाची संघटना मतदारसंघात टिकवून ठेवण्यात स्नेहल जगताप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. महाड नगर परिषदेच्या तरुण तडफदार नगराध्यक्षा म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. पक्षांतर्गत त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com