Palghar Hospital Case : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे शिंदेंच्या आमदारपुत्राला दणका! डॉक्टर मारहाणप्रकरणात सहा जणांचे जामीन रद्द

Rohit Gavit son of MLA Rajendra Gavit Bail Plea Rejected : सर्वोच्च न्यायालयाने डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनासंदर्भात दिलेल्या निकालाचे थेट परिणाम शिंदेंच्या आमदार पुत्राच्या प्रकरणावर झाला आहे.
Palghar Relief Hospital Case; MLA’s son Rohit Gavit
Palghar Relief Hospital Case; MLA’s son Rohit Gavitsarkarnama
Published on: 
Updated on: 

Palghar Relief Hospital case : पालघरमधील रिलीफ रुग्णालयात झालेल्या राडाप्रकरणी आमदारपुत्र रोहित गावित याच्यासह सहा संशयित आरोपींचे जामीन अर्ज पालघरच्या न्यायालयाने मंगळवारी (ता. २९) फेटाळले. डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा या प्रकरणावर परिणाम झाला आहे. या निकालाचा दाखला फिर्यादीच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान दिल्याने आरोपींचे जामीन अर्ज पालघरच्या न्यायालयाने फेटाळले आहेत. या प्रकरणातील सर्व २३ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

रोहित राजेंद्र गावित आणि वृषभवारे यांनी १८ सप्टेंबरला जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर मनीष ऊर्फ विकी संखे, साईराज पाटील आणि राहुल संखे यांनी १९ सप्टेंबरला, तर नीलम संखे यांनी २१ सप्टेंबरला जामीन अर्ज दाखल केला होता.

या अर्जावर २३ आणि २४ सप्टेंबरला दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सोमवारी (ता. २८) निर्णय अपेक्षित होता. मात्र फिर्यादी रुग्णालयाच्या वकिलांनी रमेश म्हात्रे यांच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ सादर केल्याने जामीन अर्जावरील निर्णय मंगळवारी देण्यात आला.

Palghar Relief Hospital Case; MLA’s son Rohit Gavit
Palghar Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा: सहा जामीन अर्ज फेटाळले; 23 आरोपी कोठडीतच

सहा संशयित आरोपींच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मुद्द्यांवर न्यायालयाने स्वतंत्र निरीक्षणे नोंदवून त्यांचे अर्ज फेटाळल्याची माहिती वकिलांनी दिली. सर्वोच्च न्यायालयातील म्हात्रे प्रकरणाचा संदर्भही या आदेशात असल्याचे वकिलांचे म्हणणे आहे.

तपास अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक निशा जाधव यांनी सहाही संशयितांना जामीन देण्यास विरोध दर्शविला. तपासाची सद्यःस्थिती, गुन्ह्यातील आरोपींची कथित भूमिका आणि उपलब्ध पुरावे विचारात घेऊन जामीन नाकारावा, अशी भूमिका सरकारी पक्षाने मांडली. दुसरीकडे आरोपींच्या वकिलांनी जामिनासंबंधीच्या कायदेशीर तरतुदी, तपासाची सद्यःस्थिती आणि आरोपींच्या कथित भूमिकेबाबत युक्तिवाद केला.

Palghar Relief Hospital Case; MLA’s son Rohit Gavit
Palghar Hospital Assault Case : शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार? पालघर रुग्णालय राडा प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, जखमी गोविंदाला...

सर्व २३ आरोपी न्यायालयीन कोठडीत

रिलीफ रुग्णालयातील राडा, कर्मचाऱ्याला मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी ६ सप्टेंबरला पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शिवसेनेचे ११ पदाधिकारी आणि गोविंदा पथकातील १२ जण अशा एकूण २३ संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीला सर्व आरोपी पोलिस कोठडीत होते. त्यानंतर एका आरोपीला १६ सप्टेंबरला, तर उर्वरित २२ आरोपींना १८ सप्टेंबरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com