Shivsena UBT Vs Shivsena : फडणवीसांचे नाव घेत राऊतांनी बॉम्ब फोडला, सामंतांचा पलटवार; 'ते ठरवणारे तुम्ही कोण?'

Uday Samant on Sanjay Raut : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्रात जातील, असा बॉम्ब खासदार संजय राऊत यांनी फोडला. यावरून आता वाद सुरू झाला असून भाजप पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील या दाव्यावर आता टीका होत आहे.
Uday Samant, Sanjay Raut
Uday Samant, Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri News : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील, असा दावा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत करताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी देखील त्यांनी रिक्त झालेल्या या पदावर फडणवीस यांची वर्णी लागणार असून, ते देशाचे नवे शिक्षणमंत्री होतील, असा दावा केला होता. यानंतर आता फडणवीस मनुष्यबळ विकास मंत्रालय चांगले सांभाळू शकतात, असा दावा राऊत यांनी केला. ज्यावर भाजपकडून खरमरीत टीका होत आहे. तर या वादात आता शिंदेंच्या शिवसेनेनं उडी घेतली असून, शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्रात जातील, असा बॉम्ब फोडत, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केंद्रात बोलावले आहे. केंद्रात मनुष्यबळ विकास खातं बघा, असे मोदींनी फडणवीस यांना सुचवल्याचा दावा राऊत यांनी केला होता. या दाव्यानंतर आता राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ठाकरेंची शिवसेना आणि भाजप आमने-सामने आली आहे. तर राऊत यांच्याविरोधात तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या दाव्यावरून रत्नागिरीमध्ये माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, फडणवीस केंद्रात जाणार या वावड्या असून, या वावड्यांवर लक्ष देऊ नका, असे ते म्हणाले. तसेच विकसित महाराष्ट्राचा संकल्प फडणवीस हेच पूर्ण करू शकतात. यामुळे फडणवीस राज्यातच राहणार असून, त्या वावड्यांवर विश्वास ठेवू नका, असे बावनकुळे यांनी म्हटले असून, राऊतांकडे तिसरा डोळा आहे का, याची माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Uday Samant, Sanjay Raut
Ambadas Danve on Uday Samant : 'उदय सामंतला अक्कल तरी असली पाहिजे'; राम मंदिर देणगीप्रकरणावरून अंबादास दानवेंचा घणाघात, शरद पवारांबाबतही मोठं विधान

एकीकडे या दाव्यानंतर भाजपकडून राऊत यांना लक्ष्य केले जात असतानाच, आता उदय सामंत यांनी देखील यावरून निशाणा साधला आहे. सामंत यांनी, चांगली स्टोरी आहे ती. याच्यामध्ये काय आहे. मी सामना वाचत नाही. पण मोदी-शाह यांच्यातील संघर्ष, फडणवीस केंद्रात जाणार हे काही सामना ठरवत नाही.

Uday Samant, Sanjay Raut
Uday Samant: शांतीनगर झोपडपट्टी आंदोलन "खरात" फॅक्टरमुळे पुन्हा चिखळले; सदावर्ते आक्रमक तर मंत्री उदय सामंत यांचा तोडगा फसला?

हे दोन नेते ठरवत असतात. यामुळे कोण कुठे जाणार हे ठरवण्याचे अधिकार भारतीय जनता पक्षाचा असून, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणी केंद्रात जायचं, कोणी मुख्यमंत्री राहायचं, हे सामनामधील सल्ल्यानं होत नाही. तसेच कोण कुठे जाणार हे राऊतही ठरवत नाहीत. सामना हा टाईमपाससाठी अनेक लोक वापरतात. तर हा पेपर किती लोक वाचतात, हे देखील आत्मचिंतन घेणाऱ्याने देखील करावं, असा टोला सामंत यांनी लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com