

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध दोन्ही शिवसेना असा सामना तयार असून त्यात एक मोठा ट्विस्ट आला आहे.
उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या निवासस्थानी शिंदे गटाचे नीलेश राणे आणि मंत्री उदय सामंत भेटायला गेले.
या अनपेक्षित भेटीने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.
Sindhudurg News : तळकोकणात सध्या नगरपंचायत नगरपरिषदांच्या निवडणुकांचा ज्वर चढत असून प्रत्यक्ष मतदानास फक्त आठवडा शिल्लक राहिला आहे. यादरम्यान णकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय येथे घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तथा कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांची शिंदेंच्या शिवसेना नेत्यांनी भेट घेतली आहे. यामुळे येथील पुन्हा राजकीय वातावरण तापले असून या भेटीने खळबळ उडाली आहे.
संदेश पारकर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असून त्यांनी भाजप नेते माजी मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. यानंतर आता त्यांनी भाजपला थेट आव्हान निर्माण करत सर्व पक्षीय कणकवली शहर विकास आघाडी तयार केली आहे. ज्यात एकनाथ शिंदे यांची देखील शिवसेना आहे. याच आघाडीतून भाजपला आता तगडे आव्हान निर्माण केलं जात आहे. तर या आघाडीसह पारकर यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना कोणतीही किंमत आणि कोणतही कसर सोडणार नाही अशी ग्वाही या आधीच आमदार नीलेश राणे यांनी दिली आहे.
यानंतर पारकर यांच्या निवासस्थानी जावून नीलेश राणे यांनी पहिल्यांद भेट घेतली. या भेटीवेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि राजन तेली ही उपस्थित होते. यामुळे आता येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या भेटीमुळे कणकवली आणि सिंधुदुर्गच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या असून जिल्ह्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेनेतच थेट लढाई पाहायला मिळत आहे. यावेळी उदय सामंत यांनी, ‘शहर विकास आघाडीला मिळणारा पाठिंबा बघता आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील’, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच पारकर यांनी आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला असून ते शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत.
येथे युती न झाल्यानेच अनेकांची निराशा झाली आहे. यामुळेच येथे सगळ्यांनी एकत्र येत शहर विकास आघाडी तयार केली आहे. ज्याला मी आणि आमचे आमदार निलेश राणे यांनी पाठिंबा दिला आहे. आतातर येथे शहर विकास आघाडीला जनतेतून पाठिंबाही वाढत आहे. हा मिळणारा पाठिंबा बघता आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी सामंत यांनी, आम्हाला नितेश राणेंबद्दल आदर असून आम्ही कोणाच्या विरोधात नाही. कणकवलीकरांना शाश्वत विकास पाहिजे. नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात आम्ही इथे आलेलो नाही, असेही त्यांनी स्पष्टीकरण देत बचावात्मक पवित्रा घेतला आहे.
तसेच त्यांनी नुकताच नीलेश राणे यांनी उपस्थित केलेल्या मतचोरी आणि बोगस मतदारावर देखील भाष्य केलं आहे. एकाच घरात 169 मते कशी असू शकतात याचा शोधच घेतला पाहिजे. मालवणमध्ये मराठा समाजाच्या व्यक्तीने अचानक ओबीसी समाजाचा दाखला घेतला. हा मराठा समाजाचा आणि ओबीसी समाजाचा अपमान आहे. ज्यांच्यावर हा आरोप झालाय त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. तर भविष्यात शहर विकास आघाडी निवडून आली की येथे विकासनिधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यासाठी गरज पडल्यास आम्ही पालकमंत्र्यांकडेच जावून मागणी करू असेही सामंत यांनी म्हटलं आहे.
FAQs :
ते कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे स्थानिक नेते आहेत.
शिंदे गटाचे नीलेश राणे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत.
कारण कणकवलीत भाजपविरुद्ध दोन्ही शिवसेना गट वेगवेगळे लढत असून अशा भेटीमुळे नवीन राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली.
अचानक आणि अनपेक्षित झाल्याने ती चर्चेचा प्रमुख विषय बनली आहे.
स्थानिक राजकारणातील पत्ते बदलण्याची शक्यता असून समीकरणे पूर्ण बदलू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.